‘आई, लवकर पैसे पाठतो..., सकाळचा ‘तो’ फोन शेवटचा, 19 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रेनेज काम सुरू असताना विचित्र अपघात झाला. त्यात 19 वर्षीय तरुणाला जीव गमावावा लागला.
छत्रपती संभाजीनगर : पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा भागात सुरू असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामात मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. चारी खोदण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अचानक अंगावर कोसळल्याने 19 वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. महेशभाई रूपसिंग डांगोर (रा. गुजरात) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ड्रेनेजसाठी सुमारे पाच फूट खोल चारी खोदण्यात आली होती. खोदकामातून काढलेली माती आणि दगड चारीच्या अगदी कडेला साठवून ठेवण्यात आले होते. काम सुरू असतानाच हा मातीचा ढिगारा अचानक ढासळला आणि काही क्षणांत महेश पूर्णपणे मातीखाली दबला गेला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी घाबरलेल्या अवस्थेत माती बाजूला करत महेशला बाहेर काढले आणि तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
advertisement
आई, लवकरच पैसे पाठवतो...
मंगळवारी सकाळीच महेशने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. 'आई, लवकरच घरी पैसे पाठवतो,' असे तो आईला म्हणाला होता. त्याच्या घरी गुजरातमध्ये आई, वडील व एक भाऊ आहे. कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे स्वप्न घेऊन तो शहरात कामाला आला होता. कासंबरी दर्गा भागात ड्रेनेजसाठी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे 5 फूट खोल चारी खोदण्याचे काम सुरू होते. त्या चारीत महेश काम करत होता.
advertisement
दरम्यान, चारी खोदून उपसलेली माती, दगड चारीलगत न टाकता काही अंतरावर टाकले असते तर दुर्घटना टळली असती.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 17, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘आई, लवकर पैसे पाठतो..., सकाळचा ‘तो’ फोन शेवटचा, 19 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर










