विश्वासाला तडा! भाड्याने नेलेली कार परस्पर गहाण ठेवली; मग मालकाकडेच मागितली खंडणी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आपली कार परत मिळत नसल्याचे पाहून नीलेश यांनी गाडीत बसवलेल्या GPS यंत्रणेचा आधार घेतला. तांत्रिक तपासात त्यांना समजलं की, त्यांची कार कामशेत (मावळ) येथील आदेश कोंडरे नावाच्या व्यक्तीकडे आहे
पिंपरी-चिंचवड: भाडेतत्त्वावर कार नेऊन ती गहाण ठेवणं आणि उलट कारमालकाकडूनच पैसे उकळण्याचा एक धक्कादायक प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. यात एका व्यक्तीनं विश्वास संपादन करून कार भाड्याने घेतली. त्यानंतर ती दुसऱ्याकडे गहाण ठेवून मूळ मालकाकडे चक्क एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
चिखली येथील शिवतेजनगरमध्ये राहणारे नीलेश भाऊराय नागरिक (३६) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी विनोद शंकर पवार (रा. काळेवाडी) याने नीलेश यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची कार भाड्याने देण्यास त्यांना प्रवृत्त केले. मात्र, ठरलेल्या मुदतीत कार परत न करता विनोदने ती परस्पर गायब केली.
advertisement
GPS मुळे फुटले बिंग: आपली कार परत मिळत नसल्याचे पाहून नीलेश यांनी गाडीत बसवलेल्या GPS यंत्रणेचा आधार घेतला. तांत्रिक तपासात त्यांना समजलं की, त्यांची कार कामशेत (मावळ) येथील आदेश कोंडरे नावाच्या व्यक्तीकडे आहे. नीलेश यांनी तात्काळ आदेशशी संपर्क साधून आपली गाडी परत मागितली.
advertisement
मालकाकडेच खंडणीची मागणी: यावेळी आदेश कोंडरे याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, "विनोद पवारने ही गाडी माझ्याकडे गहाण ठेवून पैसे घेतले आहेत." इतकंच नव्हे तर, "तुला तुझी गाडी परत हवी असेल तर मला १ लाख रुपये द्यावे लागतील," अशी धमकी आदेशने नीलेश यांना दिली. स्वतःचीच गाडी परत मिळवण्यासाठी चक्क खंडणी मागितली जात असल्याचं लक्षात येताच नीलेश यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
चिखली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विनोद शंकर पवार आणि आदेश कोंडरे या दोघांविरुद्ध फसवणूक, विश्वासाचा भंग आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भाड्याने वाहने देणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
विश्वासाला तडा! भाड्याने नेलेली कार परस्पर गहाण ठेवली; मग मालकाकडेच मागितली खंडणी









