Dharashiv News : राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं तुळजापुरात खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
Dharashiv News: तुळजापूरमध्ये झालेल्या राडा प्रकरणात थेट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाचे (PA) नाव पुढे आले आहे.
धाराशिव: तुळजापुरात ड्रग्ज तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता अवैध शस्त्रांच्या वापराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दोन गटांतील राड्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तुळजापूरमध्ये झालेल्या राडा प्रकरणात थेट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाचे (PA) नाव पुढे आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे.
काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक जयश कदम हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यासोबत तुळजापूर–नळदुर्ग रस्त्यावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी गेले आणि आमच्या नातेवाईकांना उद्देशून शिवीगाळ केली. ही शिवीगाळ जाणीवपूर्वक छेड काढण्यासाठी केल्याचा आरोप अमर कदम यांनी केला आहे.
advertisement
या घटनेनंतर दोन गटांमध्ये तणाव वाढून राड्याला तोंड फुटले. विशेष म्हणजे, आचारसंहिता लागू असताना परवाना धारक शस्त्र जमा करण्याचे आदेश असतानाही, हातात कोयते आणि गावठी कट्टे घेऊन दहशत माजवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याच राड्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला तसेच गोळीबारही करण्यात आल्याचे अमर कदम यांनी सांगितले.
advertisement
या हल्ल्यात अमर कदम यांचे भाऊ कुलदीप कदम यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आला असून, त्यांच्यावर सध्या सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, तुळजापुरात याआधी ड्रग्ज तस्करीचे प्रकरण गाजले होते. आता गावठी कट्ट्यांच्या वापराचा मुद्दा समोर आल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
December 18, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv News : राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं तुळजापुरात खळबळ









