advertisement

Iran Israel Conflict: इराणच्या आकाशातून कोसळणार मृत्यू, एका थेंबानेही होईल मृत्यू, Video पाहून उडेल थरकाप...

Last Updated:

Iran Israel Conflict: गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. एकीकडे इराण अमेरिका-इस्रायल विरोधात एकटा झुंज देत आहे.

इराणच्या आकाशातून कोसळणार मृत्यू, एका थेंबानेही होईल मृत्यू, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप...
इराणच्या आकाशातून कोसळणार मृत्यू, एका थेंबानेही होईल मृत्यू, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप...
तेहरान: गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. एकीकडे इराण अमेरिका-इस्रायल विरोधात एकटा झुंज देत आहे. अमेरिका-इस्रायलचे बॉम्ब हल्ल्यांनी मोठं नुकसान होत असताना दुसरीकडे निसर्ग आणि इतर संकटांनी इराणला घेरलं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये सध्या रक्ताच्या थारोळ्यापेक्षाही भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. इराणवर सध्या काळ्या विषारी पावसाचा धोका वाढला आहे.

तेल शुद्धीकरण केंद्रांवरील हल्ल्याचा भीषण परिणाम

शनिवारी रात्री इस्रायल आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी तेहरानमधील 'शाहरान फ्यूल डेपो' आणि 'अल्बोर्ज' तेल शुद्धीकरण केंद्रांवर क्षेपणास्त्रांचा प्रचंड मारा केला. या हल्ल्यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले आणि लाखो गॅलन तेल वातावरणात विरघळले. रविवारी सकाळी जेव्हा पाऊस सुरू झाला, तेव्हा त्याचे स्वरूप पाहून नागरिक हादरून गेले. हा पाऊस पांढरा नसून गडद काळा आणि तेलाचा उग्र वास असलेला होता.
advertisement
advertisement

'टॉक्सिक कॉकटेल': मानवी शरीरासाठी घातक

इराणी रेड क्रिसेंटने जारी केलेल्या आपत्कालीन इशाऱ्यानुसार, हा पाऊस म्हणजे सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सचे 'टॉक्सिक कॉकटेल' आहे. या पावसाचा एक थेंबही शरीरावर पडल्यास त्वचा भाजणे किंवा कायमस्वरूपी जखमा होण्याचा धोका आहे. इतकेच नाही तर यातील विषारी वायू फुफ्फुसांना गंभीर इजा पोहचवू शकतात. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि एसी बंद ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
advertisement

इराणचाही प्रतिहल्ला, इस्रालय, कुवेत आणि बहरीन लक्ष्य

इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'ने (IRGC) आखाती देशांमधील महत्त्वाच्या तळांवर ड्रोन हल्ले चढवले आहेत. इस्रायलच्याही तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने हल्ले आहेत. इराणने कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांना लक्ष्य केले, ज्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, बहरीनच्या वॉटर प्लांटवर हल्ला करून इराणने थेट इशारा दिला आहे की, जर इराणची संसाधने नष्ट केली गेली, तर संपूर्ण आखाती क्षेत्राचा पाणीपुरवठा धोक्यात येईल. सध्या इराणमध्ये युद्ध आणि विषारी पावसाचे दुहेरी संकट असून, या परिस्थितीमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran Israel Conflict: इराणच्या आकाशातून कोसळणार मृत्यू, एका थेंबानेही होईल मृत्यू, Video पाहून उडेल थरकाप...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement