IND vs NZ Final : 'कोच साहब स्माईल लुक्स...', गंभीरने इन्गोर केलं पण धोनीने मन जिंकलं! थालाची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MS Dhoni Post On Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा असल्याचे धोनीने म्हटलं. त्यावेळी त्याने गौतम गंभीरचा देखील उल्लेख केला.
T20 World Cup 2026 Title : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळून तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनासाठी टीम इंडियाने अशक्य अशी कामगिरी करून दाखवली. अहमदाबादच्या मैदानात टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी देखील उपस्थित होता. मॅचनंतर दोघांनी आनंद व्यक्त केला. अशातच थाला धोनीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनीकडून गौतम गंभीरचा उल्लेख
महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयावर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अहमदाबादच्या मैदानावर रचल्या गेलेल्या या इतिहासाचे धोनीने भरभरून कौतुक केलं असून, त्याने संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा असल्याचे धोनीने म्हटलं. त्यावेळी त्याने गौतम गंभीरचा देखील उल्लेख केला. मॅचआधी दोघंही जेव्हा मैदानात होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नव्हतं.
advertisement
कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू...
धोनीने आपल्या पोस्टमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा खास उल्लेख देखील केला. "कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू खूप छान दिसतंय," असं म्हणत धोनीने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. गंभीरची मैदानातील जिंकण्याची इच्छाशक्ती आणि हे हास्य म्हणजे एक 'किलर कॉम्बो' असल्याचं धोनीने मिश्किलपणे म्हटलं आहे.
advertisement
एक छक्केने वर्ल्ड कप नही जिताया
दरम्यान, 2011 च्या वर्ल्ड कप फायनलपासून धोनी आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद निर्माण झाले होते. एक छक्केने वर्ल्ड कप नही जिताया, असं म्हणत गंभीर अजूनही धोनीला टोमणा मारतो. तसेच दोघांच्या पीआर टीम अनेकदा एकमेकांचे वाभाडे काढताना दिसते. अशातच धोनीने गंभीरसाठी केलेली पोस्ट पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 7:50 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : 'कोच साहब स्माईल लुक्स...', गंभीरने इन्गोर केलं पण धोनीने मन जिंकलं! थालाची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!







