advertisement

T20 World Cup जिंकला, आता पूढे काय? टीम इंडिया पुन्हा कधी मैदानात उतरणार

Last Updated:

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आता पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होता.तर टीम इंडिया आता पुन्हा कधी मैदानात उतरणार? हे जाणून घेऊयात.

Team India Upcomimg Schedule
Team India Upcomimg Schedule
Team India Upcomimg Schedule : अहमदाबादच्या मैदानावर रविवारी टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला होता.कारण टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. तर सलग दोनदा वर्ल्ड कप उंचावण्याची किमया केली होती. यासोबतच यजमान टीम म्हणून पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान उचलला होता. दरम्यान टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आता पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होता.तर टीम इंडिया आता पुन्हा कधी मैदानात उतरणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला पण आता पुढचे चार महिने तरी टीम इंडिया टी20 सीरीज खेळताना दिसणार नाही आहे. कारण 28 मार्चपासून आयपीएलला सूरूवात होत आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया लगेचच अफगाणिस्तानसोबत एक टेस्ट आणि तीन वनडे सीरीज खेळताना दिसणार आहे.त्यानंतर भारत त्यांची पुढची टी20 सीरीज खेळणार आहे.
टी20 सीरीज कधी?
टीम इंडियाची पुढची टी20 सीरीज आता जुलैमध्ये आहे.भारतीय संघ 1 जुलै ते 19 जुलै 2026 दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला पाच टी20 सामने खेळाले लागणार आहेत. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्यामुळे आता टीम इंडियाची वर्ल्ड कप विजेती टीम आता जुलैमध्ये मैदानात उतरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे जे खेळाडू टी20 खेळतात, त्यांनाच आता टी20 संघात एंन्ट्री होणार आहे.
advertisement

भारत-इंग्लंड दौऱ्याच संपूर्ण वेळापत्रक

टी20 मालिका
पहिला टी20 : 1 जुलै 2026,चेस्टर ली स्ट्रीट (रात्री 11 वाजता)
दुसरा टी20 : 4 जुलै 2026,मॅचेस्टर (रात्री 8 वाजता)
तिसरा टी20 : 7 जुलै 2026,नॉटीघम, (रात्री 12 वाजता)
चौथा टी20 : 9 जुलै 2026, ब्रिस्टॉल (रात्री 12 वाजता)
पाचवा टी20 : 11 जुलै 2026,साउथैम्पटन (रात्री 12 वाजता)
advertisement
वनडे मालिका
पहिला वनडे : 14 जुलै 2026, बर्मिगम, (संध्याकाळी 6.30 वाजता)
दुसरा वनडे : 16 जुलै 2026, कार्डिफ, (संध्याकाळी 6.30 वाजता)
तिसरा वनडे : 19 जुलै 2026, लंडन (संध्याकाळी 4.30 वाजता)
इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या सामन्याच्या वेळापत्रक जाहीर झालं नाही आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup जिंकला, आता पूढे काय? टीम इंडिया पुन्हा कधी मैदानात उतरणार
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement