फिरण्यासाठी गेला; पानशेत धरणाच्या कडेला जाऊन भेळ खाल्ली, दारू प्यायला अन् काहीच वेळात मृत्यू, काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हे चौघे मित्र पानशेत धरणाच्या परिसरात आले. धरणाच्या कडेला बसून त्यांनी भेळ खाल्ली आणि सोबतच मद्यप्राशनही केले.
वेल्हे: फिरायला गेलेल्या मित्रांच्या पार्टीचा शेवट अत्यंत भीषण शोकांतिकेत झाला आहे. मद्याच्या नशेत पानशेत धरणाच्या खोल पाण्यात पोहायला गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. सद्दाम चाँद व्हसुरे (रा. नांदेड सिटी, हवेली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम व्हसुरे हा त्याचे मित्र प्रकाश माळी, अनिल ओवाळ आणि राहुल गायकवाड यांच्यासोबत राहुलच्या कारने राजगड तालुक्यातील माणगाव येथे फिरण्यासाठी गेला होता. तिथे प्रकाश माळी यांच्या सासुरवाडीला भेट दिल्यानंतर हे चौघे मित्र पानशेत धरणाच्या परिसरात आले. धरणाच्या कडेला बसून त्यांनी भेळ खाल्ली आणि सोबतच मद्यप्राशनही केले.
advertisement
नशेत धरणात मारलेली उडी ठरली शेवटची: मद्याच्या नशेत असताना सद्दामला पोहण्याचा मोह आवरला नाही. तो अचानक धरणाच्या खोल पाण्यात उतरला. मात्र, काही अंतर पोहून गेल्यानंतर त्याला दम लागला आणि तो पाण्यात बुडू लागला. सद्दामला बुडताना पाहून प्रकाश माळी याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. प्रकाशला पोहता येत असल्याने त्याने सद्दामला पाण्याच्या बाहेर काढले, मात्र तोपर्यंत सद्दाम बेशुद्ध झाला होता.
advertisement
मित्रांनी तात्काळ पानशेत पोलीस दूरक्षेत्र गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सद्दामला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सद्दामच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोघे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी मद्यप्राशन करून धाडस करणे किती धोक्याचे ठरू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
फिरण्यासाठी गेला; पानशेत धरणाच्या कडेला जाऊन भेळ खाल्ली, दारू प्यायला अन् काहीच वेळात मृत्यू, काय घडलं?







