advertisement

Iran Israel Conflict: भारतावर इंधन संकट! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची इराणसोबत चर्चा, फोनवर काय झालं बोलणं?

Last Updated:

S. Jaishankar Talk With Iran: इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती आणि आखातातील १ कोटी भारतीयांची सुरक्षा, या दुहेरी संकटात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तातडीने इराणशी संपर्क साधला आहे.

भारतावर इंधन संकट! जयशंकर यांची इराणसोबत चर्चा, फोनवर काय झालं बोलणं?
भारतावर इंधन संकट! जयशंकर यांची इराणसोबत चर्चा, फोनवर काय झालं बोलणं?
Iran Israel Conflict:  इराण आणि अमेरिका-इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाला १३ दिवस झाले असले तरी कोणताही तोडगा निघताना दिसत नाही. इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर, दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली राजकीय पातळीवरील हालचालींना वेग दिला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. पश्चिम आशियातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि जागतिक व्यापारी जहाजांची सुरक्षा यावर या संभाषणात भर देण्यात आला.
भारतावर इंधन संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक ठिकाणी एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र असल्याने देशात नवीन संकट निर्माण होण्याची भीती आहे. गॅस अभावी उद्योग बंद करण्याची वेळ आल्याने उत्पादन, रोजगार थंडावले आहेत. तर, रेस्टोरंट्स-हॉटेलही बंद होऊ लागली आहेत. घरगुती ग्राहकांना देखील एलपीजीसाठीचा वेटिंग पीरियड वाढला आहे.
advertisement

मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर पहिलीच चर्चा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात हत्या झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या राजकीय बदलानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील ही पहिलीच चर्चा होती. डॉ. जयशंकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, "मी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संघर्षाच्या ताज्या घडामोडींवर चर्चा केली असून आम्ही सतत संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे."
advertisement

होर्मुझची सामुद्रधुनी बंद, भारताची चिंता वाढली

इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा मार्ग जवळजवळ बंद केला आहे. जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा व्यापार याच मार्गातून होतो. या निर्णयामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करत असल्याने, पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
advertisement

१ कोटी भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न

आखाती देशांमध्ये अंदाजे १ कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. युद्धाच्या या स्थितीत त्यांची सुरक्षा ही भारत सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सरकारने संसदेत निवेदनात स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशीही चर्चा करून या जागतिक संकटावर विचारविनिमय केला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Iran Israel Conflict: भारतावर इंधन संकट! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची इराणसोबत चर्चा, फोनवर काय झालं बोलणं?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement