Navi Mumbai : शहराबाहेर पडणं आता होणार सोप; नवी मुंबईतही भुयारी मार्ग; पाहा कुठून-कुठे असेल?
Last Updated:
Palm Beach Underground Road: नवी मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आता या शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून लवकर सुटका मिळणार आहे.
नवी मुंबई : गेल्या काही वर्षभरापासून मुंबई पाठोपाठ नवी मुंबई शहरात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे.या सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. या सर्वांमुळे नवी मुंबईतील काही शहरातून बाहेर पडणे खुप त्रास दायक ठरत आहे, पण आता नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाढती वाहनांची संख्या आणि त्यापाठोपाठ मुख्य मुद्दा म्हणजे लोकसंख्या या सर्वांचा विचार करता पाम बीच असलेल्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सानपाडा सेक्टर 19 येथे भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे.
सानपाडा येथील भुयारी प्रकल्प हा नवी मुंबई महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला असून या गोष्टीमुळे सानपाडा तसेच जुईनगर शहरवासियांना शहराबाहेर पडताना वाहतूककोंडी भेडसावणार नाही. शहरातील वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे समोर येत आहे.
advertisement
नेमका हा मार्ग असणार कुठे?
सानपाडा सेक्टर 19 येथे असलेल्या सोलिटेअर इमारतीजवळ हा नवा भुयारी मार्ग प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे शिवाय परिसरातील स्थानिक नागरिकांकडूनही या मार्गाची मागणी केली जात होती.
पाम बीच रोडवर भविष्यात कोंडीचे सावट?
सध्याच्या स्थितीला सानपाडा नोडमध्ये पाम बीच मार्गावर येण्यासाठी मोराज सर्कलजवळ असलेला एकच मार्ग उपलब्ध आहे. विशेष म्हणजे वाढती वाहतूककोंडी , जवळच उभारण्यात येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जेएनपीटी बंदराचे विस्तारीकरण आणि तिसरी मुंबई या सर्व प्रकल्पामुळे येत्या काही दिवसात पाम बीच मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर मोठा ताण येऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : शहराबाहेर पडणं आता होणार सोप; नवी मुंबईतही भुयारी मार्ग; पाहा कुठून-कुठे असेल?







