Shani Asta 2026: नशीब जोमात! शनिसह 3 मोठ्या ग्रहांचा अस्तकाळ! 4 राशींना सोन्याचे दिवस येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनिचा चाल महत्त्वाची मानली जाते. 13 मार्च रोजी शनि मीन राशीत अस्त होणार असून, तो 22 एप्रिल रोजी पुन्हा उदित होईल. विशेष म्हणजे, मंगळ आधीच 1 नोव्हेंबर 2025 पासून अस्त असून तो 2 मे पर्यंत याच स्थितीत राहील. तसेच 1 मार्चला अस्त झालेला बुध 18 मार्चला उदित होईल.
advertisement
सिंह - तुमच्या करिअरमध्ये येत असलेल्या अडचणी आता हळूहळू दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमची प्रगती पाहून काही जवळच्या लोकांना मत्सर वाटू शकतो, पण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, व्यवसायाचा विस्तार करण्यावर तुमचा भर रासेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे कठीण कामेही तुम्ही सहज पूर्ण कराल.
advertisement
धनु - तुमच्या आयुष्यात सुख-सुविधा वाढतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त भक्कम होईल. अचानक धनलाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमची ठरवलेली ध्येये सहजपणे गाठू शकाल. जीवनात काही सकारात्मक बदल घडून येतील. वैवाहिक आयुष्य सुखाचे राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादी खास भेटवस्तू देऊ शकता. आई-वडिलांसोबतचे तुमचे नाते अधिक चांगले होईल.
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना अनपेक्षित मार्गानी पैसा मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातील नवीन सौदे फायदेशीर ठरतील. मित्र किंवा नातेवाईकांकडे अडकलेले तुमचे पैसे आता परत मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित जुने वाद सुटण्याची शक्यता आहे. जे लोक सर्जनशील (क्रिएटिव्ह) क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. मानसिक ताण कमी होईल आणि आयुष्यात एक प्रकारचा समतोल जाणवेल.
advertisement
मीन - व्यापारी वर्गासाठी हा काळ खूपच चांगला आहे, विशेषतः जे लोक भागीदारीत (पार्टनरशिप) व्यवसाय करतात त्यांना मोठा नफा मिळेल. खर्चावर तुमचे नियंत्रण राहील आणि तुम्ही भविष्यातील गुंतवणुकीच्या योजनांवर लक्ष केंद्रित कराल. या काळात तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेताना खूप विचारपूर्वक पाऊल टाकाल. कुटुंबाच्या आनंदाची तुम्ही पूर्ण काळजी घ्याल. एखाद्या शुभ कार्यात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि आरोग्याच्या तक्रारींपासून सुटका मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









