Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवामानाचा पॅटर्न बदलला, 19 डिसेंबरला अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे डिसेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट निर्माण झाली होती. आता थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी ठाणे-मुंबई परिसरात काही प्रमाणात गारठा कायम आहे. 19 डिसेंबरला ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात पुन्हा बदल जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बदलापूर, शहापूर आणि मुरबाड परिसरात देखील हवामानात बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट कमी झाली असली तरी या भागात देखील गारठा कायम असून सकाळी दाट धुके पडत आहे. बदलापूरला किमान तापमान 15 अंशांपर्यत घसरले असून मुरबाडमध्ये ते 18 अंश सेल्सिअवर राहील. हवामानातील सततच्या बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.








