भाजपला सोडलेल्या नेत्याकडूनच अशोकरावांचा धुव्वा, सिक्सर मारायला गेलेलं कुटुंब क्लिन बोल्ड, चिखलीकर जाएंट किलर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Loha Nagar Parishad Election: 'घराणेशाही संपवू' असा आक्रमक नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचाच मोठा फटका बसला आहे.
लोहा: 'घराणेशाही संपवू' असा आक्रमक नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचाच मोठा फटका बसला आहे. इथं भाजपनं एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पण हा निर्णय भाजपच्या अंगल आला. भाजपच्या या सहाही उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. इथं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निर्ववाद वर्चस्व गाजवत नगराध्यक्षपदासह १७ जागांवर विजय खेचून आणला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी चिखलीकरांनी भाजप सोडली होती. आता त्याच नेत्याने अशोक चव्हाणांचा धुव्वा उडवला आहे.
एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी
लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबावर मोठी भिस्त टाकली होती. गजानन सूर्यवंशी हे स्वत: भाजपचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांना प्रभाग ७ अ, भाऊ सचिन सूर्यवंशी यांना प्रभाग १ अ, भावजय सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग ८ अ, मेहुणे युवराज वाघमारे प्रभाग ७ ब, भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली होती. पण या सहाही उमेदवारांचा पराभव झाला आहे.
advertisement
एकाच घरात इतकी तिकिटे वाटल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. तसेच मतदारांना देखील ही घराणेशाही पटली नसल्याचं निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार करत भाजपच्या गडाला सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १७ जागा जिंकून पालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयामुळे लोहा शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
advertisement
शिवसेना (UBT) आणि काँग्रेसची स्थिती
एकीकडे राष्ट्रवादीने एकतर्फी विजय मिळवला असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केवळ १ जागेवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेसलाही फक्त १ जागा जिंकता आली.
रोहा नगर परिषदेचा संपूर्ण निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस: 17 जागा + नगराध्यक्ष पद (विजयी)
शिवसेना (UBT): 01 जागा
काँग्रेस: 01 जागा
advertisement
भाजप: 00
view commentsLocation :
Loha,Nanded,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपला सोडलेल्या नेत्याकडूनच अशोकरावांचा धुव्वा, सिक्सर मारायला गेलेलं कुटुंब क्लिन बोल्ड, चिखलीकर जाएंट किलर











