RCF Recruitment : नोकरीच्या शोधात असाल तर खुशखबर! 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा

Last Updated:

Railway Jobs 2025 : तरुणांनो तयारीला लागा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणतीही परीक्षा न देता उमेदवारांची निवड होणार असून 550 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा.

News18
News18
रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. जर तुमच्या ओळखीपैंकी कोण सरकारी नोकरीच्या शोधात आहे तर ही बातमी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे कोच फॅक्टरी (RCF)मध्ये सध्या अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे उमेदवारांची निवड कोणतीही लेखी परीक्षा न घेता केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
10वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
रेल्वे कोच फॅक्टरी ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील प्रमुख युनिट असून येथे विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिसची भरती सुरू आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, पेंटर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर या पदांचा समावेश आहे. या भरतीमुळे तरुणांना तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची आणि रेल्वे क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 असून 15 ते 24 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
advertisement
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा?
1)सर्वप्रथम www.rcf.indianrailways.gov.inया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2) त्यानंतर नवीन उमेदवारांनी नोंदणी (Registration) करून आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
advertisement
3)नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करा.
4)अर्जामध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूकपणे भरा.
5)10वीची गुणपत्रिका आणि आयटीआय प्रमाणपत्र अपलोड करा.
6)त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज सबमिट करा.
7)भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून जतन करून ठेवा
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
RCF Recruitment : नोकरीच्या शोधात असाल तर खुशखबर! 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement