advertisement

80 वर्षांची परंपरा, प्रसिद्ध मिळतात दहीवडे, तुम्ही अमरावतीमध्ये कधी चाखलीये चव?

Last Updated:
येथील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे कांजी वडा. आंबट तिखट चवीचा हा पदार्थ खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. अमरावतीबाहेर राहणारे अनेकजण शहरात आल्यावर या चवीचा आस्वाद घ्यायलाच येथे येतात.
1/7
अमरावती शहराची खाद्यसंस्कृती राज्यभर प्रसिद्ध आहे. गिला वडा, संभार वडी, कांजी वडा अशा पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरून खवय्ये येथे येत असतात.

2/7
याच चवीची परंपरा तब्बल 80 वर्षांपासून जपणारे नाव म्हणजे नानकरामजी दहीवडेवाले. चव, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवत या नाश्ता सेंटरने अमरावतीच्या खाद्यपरंपरेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

3/7
सुमारे आठ दशकांपूर्वी शर्मा कुटुंबाने एका छोट्याशा दुकानातून या व्यवसायाची सुरुवात केली. राजेंद्रकुमार शर्मा यांच्या वडिलांनी दही वडा, समोसा आणि काही मोजक्या पदार्थांपासून हा नाश्ता सेंटर सुरू केला. घरगुती चव, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि हे ठिकाण लवकरच लोकप्रिय झाले.

4/7
काळानुसार येथे उपलब्ध पदार्थांची संख्या वाढली. गिला वडा, कांजी वडा यांसारखे पदार्थ मेन्यूमध्ये समाविष्ट झाले. मात्र पदार्थ कितीही वाढले तरी चवीत आणि गुणवत्तेत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. याच सातत्यामुळे नानकरामजी दहीवडेवाले हे नाव अमरावतीतील आवडते नाश्ता सेंटर बनले.

5/7
येथील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे कांजी वडा. आंबट तिखट चवीचा हा पदार्थ खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. अमरावतीबाहेर राहणारे अनेकजण शहरात आल्यावर या चवीचा आस्वाद घ्यायलाच येथे येतात. काहींना तर या कांजी वड्याची चव परदेशातही पोहोचावी अशी इच्छा असते.

6/7
कालांतराने व्यवसायाची सूत्रे राजेंद्रकुमार शर्मा यांनी सांभाळली. आज त्यांच्या तीन मुलांकडून हा वारसा पुढे नेला जात आहे. एकाच परिसरात तीन दुकाने सुरू असली, तरी ग्राहकांची गर्दी कायम असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणाऱ्या रांगा या चवीच्या लोकप्रियतेची साक्ष देतात.

7/7
परंपरा, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर 80 वर्षांपासून खवय्यांच्या जिभेची चव जपणारे नानकरामजी दहीवडेवाले आजही अमरावतीच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement