Weather Alert : महाराष्ट्रावर दुहेरी संकट, उष्णतेच्या लाटेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना 13 मार्च रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना 13 मार्च रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट कायम असेल. 13 मार्च रोजी विभागानुसार हवामान कसं असेल पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-40 अंश तर किमान 21-24 अंश तापमान राहील. यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement










