15 मार्चला घडणार काही तरी मोठं! 4 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, वाढणार अडचणी; हेल्थवर होणार परिणाम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार 15 मार्च 2026 रोजी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
advertisement
मेष - मानसिक आणि शारीरिक कष्ट: मेष राशीच्या बाराव्या भावात ही युती होणार आहे. यामुळे अनावश्यक खर्चात प्रचंड वाढ होईल. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या जाणवू शकतात. या काळात कोर्ट-कचेरीच्या कामांपासून दूर राहा आणि कोणालाही जामीन राहू नका, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागेल.
advertisement
सिंह - अपघाताची शक्यता आणि गुप्त चिंता: तुमचा राशीस्वामी सूर्य आठव्या भावात शनीसोबत युती करत आहे. हे स्थान संकटांचे मानले जाते. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमचे छुपे शत्रू सक्रिय होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः हाडांच्या तक्रारी उद्भवू शकतात. मोठे आर्थिक व्यवहार महिनाभर पुढे ढकलणे हिताचे ठरेल.
advertisement
तूळ - शत्रूंचा त्रास आणि वादविवाद: तूळ राशीच्या सहाव्या भावात सूर्य आणि शनीची युती होत आहे. यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. मामा किंवा मावशीकडून मिळणाऱ्या सहकार्यात अडथळे येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी विनाकारण वाद होतील. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा, अन्यथा तुमची प्रतिमा मलीन होऊ शकते.
advertisement
मीन - मानसिक गोंधळ आणि प्रतिष्ठा: ही युती तुमच्याच राशीत होत आहे. यामुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा आणि अहंकाराची भावना वाढू शकते. घेतलेले निर्णय चुकीचे ठरण्याची शक्यता असल्याने महत्त्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्या. भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थकवा देणारा असेल.
advertisement
वडिलांशी असलेल्या नात्यात तणाव: सूर्य हा पित्याचा कारक आहे, तर शनी हा विद्रोहाचा. या युतीमुळे वडिलांशी किंवा वडिलांच्या वयाच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बोलताना मर्यादा पाळा. त्यांच्या आशीर्वादानेच या संकटाची तीव्रता कमी होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







