Jay Pawar News : अजित पवार यांच्या विमान अपघातात फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. भेटीनंतर इमारतीतून खाली येताना लिफ्टमधून आवाज आल्यामुळे जय पवार यांनी लिफ्टने जाणे टाळले आणि तब्बल १८ मजले पायी उतरल्याची माहिती समोर आली आहे.



