advertisement

Summer Care : उन्हाळ्यात महिलांनी घ्या विशेष काळजी, रजोनिवृत्तीच्या काळातल्या महिलांसाठी ऋजुता दिवेकरांनी दिल्यात महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:

तीव्र उष्णता आणि कडक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात उष्णतेवर मात करण्याचे मार्ग त्यांनी सुचवले आहेत. या टिप्स खास करुन पेरीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या काळात असलेल्या महिलांसाठी आहेत.

News18
News18
मुंबई : मार्च महिना मध्यावर आलाय आणि आतापासूनच एप्रिल मे महिन्यासारख्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.
या तीव्र उष्णता आणि कडक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात उष्णतेवर मात करण्याचे मार्ग त्यांनी सुचवले आहेत. या टिप्स खास करुन पेरीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या काळात असलेल्या महिलांसाठी आहेत.
आरोग्याबद्दल थोडीशीही निष्काळजी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. कारण या ऋतूत उष्माघात, थकवा आणि पोटाचे आजार होण्याचं प्रमाण वाढतं. विशेषतः रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या महिलांना हा ऋतू कठीण वाटू शकतो.
advertisement
उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे आपल्याला आळस येतो. त्यामुळे ऋजुता दिवेकर यांनी दररोज दुपारी बारा वाजण्यापूर्वी एक ग्लास नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. नारळाच्या पाण्यात एक चमचा सब्जा बियाणं मिसळा आणि ते प्या असंही त्यांनी सांगितलंय.
advertisement
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि मॅंगनीज असतात. हे नैसर्गिकरित्या थंड असल्यानं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि यामुळे पचन सुधारू शकतं.
दुपारच्या जेवणासाठी दही किंवा ताक - दुपारच्या जेवणासोबत दही किंवा ताक घ्या. पण त्यात ताजी भाजलेली जिरा पावडर नक्की घाला असा सल्लाही त्यांनी दिलाय. दही आणि जिरं दोन्हीची मूळ प्रकृती थंड असते. यामुळे तुमचं पोट शांत राहतं.
advertisement
संध्याकाळी किंवा जेवणानंतर केळी खा - केळी पोटाच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. केळी पोटासाठी खूप चांगली मानली जातात कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. यामुळे सकाळी तुमचं पोट हलकं आणि स्वच्छ ठेवण्यास मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : उन्हाळ्यात महिलांनी घ्या विशेष काळजी, रजोनिवृत्तीच्या काळातल्या महिलांसाठी ऋजुता दिवेकरांनी दिल्यात महत्त्वाच्या टिप्स
Next Article
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग', आता एक चूक जगाचा पाया हलवणार
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग'
  • इराणचा सर्वात मोठा जुगार

  • पेट्रोल-डिझेलसाठी हाहाकार माजणार

  • जागतिक तेल पुरवठा ठप्प होण्याची भीती

View All
advertisement