Kavya Maran : काव्या मारनने धोका दिला, पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतलं, बीसीसीआयचा नियम मोडला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बीसीसीआयचा नियम पायदळी तुडवत पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतलं आहे.
मुंबई : सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बीसीसीआयचा नियम पायदळी तुडवत पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतलं आहे. काव्या मारनने लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली आणि त्याला टीममध्ये घेतलं. भारतीय टीमचे मालक पाकिस्तानी खेळाडूंना टीममध्ये घेणार नाहीत, या अलिखित नियमांचं काव्या मारनकडून उल्लंघन केलं गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
इंग्लंडची स्पर्धा असलेल्या द हंड्रेडमध्ये काव्या मारनच्या मालकीची टीम आहे. या टीमने पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदला टीममध्ये घेतलं आहे. द हंड्रेडच्या लिलावामध्ये अबरार अहमदसाठी दीर्घ बोली लागली, ज्यात काव्या मारनने त्याच्यासाठी तब्बल 1,90,000 पाऊंड (अंदाजे 2.64 कोटी रुपये) देऊन अबरार अहमदला टीममध्ये घेतलं. 27 वर्षीय अबरार अहमदने पाकिस्तानसाठी 10 टेस्ट, 15 वनडे आणि 38 टी-20 मॅच खेळल्या आहेत.
advertisement
अबरार अहमद हा 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीमचा भाग होता. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अबरारने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अबरारने 23 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. अबरार अहमदची द हंड्रेडमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी अबरार अहमद पाकिस्तान सुपर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळला आहे. काव्याने अबरारची टीममध्ये निवड केली असली तरी पीसीबीकडून मंजुरी मिळाली तरच अबरार द हंड्रेडमध्ये खेळू शकणार आहे.
advertisement
The moment, The Magician Abrar Ahmed was picked by Sunrises Leeds at a whooping £190,000. pic.twitter.com/U7iUMJk7gw
— Salman. (@TsMeSalman) March 12, 2026
काव्या मारनच्या मालकीची टीम
द हंड्रेडमधली सनरायझर्स लीड्स ही टीम पूर्णपणे भारतीय मीडिया समूह सन ग्रुपच्या मालकीची आहे, ज्याचे नेतृत्व कलानिथी मारन आणि त्यांची मुलगी, सीईओ काव्या मारन करतात. फ्रँचायझीला पूर्वी नॉर्दर्न सुपरचार्जर्स म्हटले जात होते, पण आता या टीमला सनरायजर्सने विकत घेतलं.
advertisement
द हंड्रेडमध्ये भारतीय कंपन्यांनी फ्रँचायझी विकत घेतल्याने अफवा पसरल्या होत्या की पाकिस्तानी खेळाडूंना लिलावात निवडले जाणार नाही. आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग असलेल्या SA20 मध्येही सर्व टीम भारतीय मालकांच्या आहेत.
द हंड्रेडच्या लिलावाआधी भारतीय मालक पाकिस्तानी खेळाडूंना टीममध्ये घेणार नाहीत, असं बोललं जात होतं, यानंतर इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने संयुक्त निवेदन जारी केलं आणि सर्व समावेशकता आणि भेदभाव विरोधी धोरणांचं लिलावात पालन केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं.
advertisement
'द हंड्रेड ही एक समावेशक, स्वागतार्ह आणि सर्वांसाठी खुली स्पर्धा राहावी यासाठी वचनबद्ध आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि द हंड्रेड टीमच्या आठही फ्रँचायझी याची पुष्टी करत आहेत', असं इसीबीने एका निवेदनात म्हटलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kavya Maran : काव्या मारनने धोका दिला, पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतलं, बीसीसीआयचा नियम मोडला!






