शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
NSE IPO Update: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतिक्षित IPO साठी तयारी वेगाने सुरू झाली असून सुमारे 20–21 गुंतवणूक बँकांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: भारताच्या प्रमुख शेअर बाजारांपैकी एक असलेल्या National Stock Exchange of India (NSE) चा IPO (Initial Public Offering) आणण्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे. Moneycontrolने दिलेल्या वृत्तानुसार एक्सचेंजने आपल्या मेगा IPO साठी सुमारे 20–21 गुंतवणूक बँकांची शॉर्टलिस्ट केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या संस्थांमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी, जेएम फायनान्शियल, जेपी मॉर्गन, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि मॉर्गन स्टॅनली यांचा समावेश आहे. या मोठ्या इश्यू साठी 7 ते 9 कायदेशीर सल्लागार (लॉ फर्म्स) देखील शॉर्टलिस्ट करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
Rothschild ची सल्लागार म्हणून नियुक्ती
IPO प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी NSE च्या IPO समितीने Rothschild & Co या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला स्वतंत्र सल्लागार (Independent Advisor) म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी NSE ने तांत्रिक आणि व्यावसायिक प्रस्तावांच्या आधारे विविध संस्थांशी चर्चा केली होती. NSE च्या निवेदनानुसार Rothschild ची भूमिका पारदर्शक आणि सुशासनाधारित प्रक्रियेद्वारे IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs), कायदेशीर सल्लागार आणि इतर मध्यस्थांची निवड करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणे अशी असेल.
advertisement
यामध्ये निष्पक्ष मूल्यांकनाची रूपरेषा तयार करणे, निवडीसाठी स्पष्ट निकष ठरवणे, निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचे व्यवस्थापन करणे अशा जबाबदाऱ्या समावेश आहे.
या प्रक्रियेत दस्तऐवजीकरण, स्पष्टीकरण, समन्वय तसेच अंतर्गत हितधारकांकडून अभिप्राय गोळा करणे यांचा समावेश असेल. तसेच सर्व संबंधित पक्षांमध्ये समान माहितीची देवाणघेवाण, नियमित संवाद आणि निर्णयांची योग्य नोंद ठेवली जाईल, याचीही खात्री केली जाईल.
advertisement
ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे IPO
6 फेब्रुवारी रोजी झालेल्या NSE बोर्ड बैठकीनंतर IPO ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने आणण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेत विद्यमान भागधारक आपली हिस्सेदारी विकतील.
कंपनीचे प्रमुख संस्थात्मक भागधारक
Life Insurance Corporation of India (LIC)
State Bank of India (SBI)
Temasek (सिंगापूरची गुंतवणूक संस्था)
NSE चे नेतृत्व सध्या एमडी आणि सीईओ Ashish Kumar Chauhan करत आहेत. बोर्ड बैठकीनंतर IPO च्या प्रक्रियेसाठी एक समर्पित IPO समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून IPO गव्हर्नन्सची रचना अधिक मजबूत करण्यात आली आहे.
advertisement
स्थापनेनंतर 34 वर्षांनी लिस्टिंगची तयारी
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 मध्ये झाली आणि 1994 मध्ये भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज म्हणून त्याने कामकाज सुरू केले. आज NSE गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांसाठी उच्च-गती आणि तंत्रज्ञानाधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. ज्यात इक्विटी (Equity), कर्जरोखे (Debt), कमोडिटी, चलन (Currency),डेरिव्हेटिव्ह्स तसेच Exchange Traded Fund (ETF) व्यवहारांचा समावेश होतो.
advertisement
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 9:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स







