advertisement

APMC Market: लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात 

+
News18

News18

सांगली : राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 99 हजार 272 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 24 हजार 593 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 316 ते 1143 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2330 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 965 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 460 क्विंटल लिंबूस 2000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल लिंबूस 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1683 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 857 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 404 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 180 क्विंटल केळीस प्रतीनुसार 800 ते 1700 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement