advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये काळाचा घाला! शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Last Updated:

प्रेम लोक पार्क परिसरातून आकुर्डीहून चिंचवडगावच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या एका अवजड  ट्रकने त्याला जोराची धडक दिली.

News18
News18
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव ट्रकने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे. शाळेतून सायकलवर आनंदाने घरी परतणाऱ्या 14 वर्षीय मुलाला एका ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना आकुर्डी ते चिंचवडगाव रस्त्यावर घडली. फारुक शकील तांबोळी असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुक तांबोळी हा शाळेतून सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सायकलवरून आपल्या घराकडे निघाला होता. प्रेम लोक पार्क परिसरातून आकुर्डीहून चिंचवडगावच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या एका अवजड  ट्रकने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, फारुक थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचे दृश्य परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका बेजबाबदार चालकामुळे फारुकचा जीव गेला. भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे रस्त्यावरील नागरिक सुन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. सध्या चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील अवजड वाहनांच्या वेगावर आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडमध्ये काळाचा घाला! शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत
Next Article
सत्ता हाती घेताच सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनींचा धडकी भरवणारा संदेश,रक्ताचा बदला घेणारच; 'होर्मुझची सामुद्रधुनी बंद करा'
सत्ता हाती घेताच मोज्तबा खामेनींचा धडकी भरवणारा संदेश, रक्ताचा बदला घेणारच
View All
advertisement