advertisement

VIDEO : मिरा भाईंदरमध्ये ट्रॅफीक पोलिसावर हल्ला, दुचाकीवर आलेल्या तरुणांनी...नेमकं काय घडलं?

Last Updated:

मिरा भाईंदरमध्ये एका ट्रॅफिक पोलीसवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बाईकरून आलेल्या काही तरुणांनी ट्रॅफिक पोलीस हा हल्ला केला होता.या हल्ल्यात मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे हे जखमी झाले आहेत.

mira bhaynder traffice police
mira bhaynder traffice police
Mira Bhaynder News: दिपाली मिश्रा, प्रतिनिधी, मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरा भाईंदरमध्ये एका ट्रॅफिक पोलीसवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बाईकरून आलेल्या काही तरुणांनी ट्रॅफिक पोलीस हा हल्ला केला होता.या हल्ल्यात मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे हे जखमी झाले आहेत.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे हे आज अमर पॅलेस येथे ड्यूटीवर होते.या दरम्यान दुचाकीने आलेल्या काही तरूणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
[video width="848" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-12-at-10.19.03-PM-2026-03-bff5fbf7a1f712c549c2bd68f77fd831.mp4"][/video]
व्हिडिओमध्ये या घटनेदरम्यान अनेक जण जमल्याचे आणि मारहाण होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी वाहतूक कर्मचारी नम्रता मिनोजी या बाजूला उभ्या असल्याचेही दिसून येते.तर काही तरूण किरण सहाने यांना मारहाण करताना दिसत आहे.विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणावर गाड्या देखील रस्त्यावर उभ्या होत्या. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण मारहाणीत जखमी झालेले वाहतूक पोलीस निरीक्षक किरण सहाणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
दरम्यान या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO : मिरा भाईंदरमध्ये ट्रॅफीक पोलिसावर हल्ला, दुचाकीवर आलेल्या तरुणांनी...नेमकं काय घडलं?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement