advertisement

T20 वर्ल्ड कप संपला... आता टीम इंडिया मैदानात कधी उतरणार? BCCI ने शेड्यूल सांगितलं!

Last Updated:

लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. या टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात कधी उतरणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

T20 वर्ल्ड कप संपला... आता टीम इंडिया मैदानात कधी उतरणार? BCCI ने शेड्यूल सांगितलं!
T20 वर्ल्ड कप संपला... आता टीम इंडिया मैदानात कधी उतरणार? BCCI ने शेड्यूल सांगितलं!
मुंबई : लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. रविवार 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आणि टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाचा हा लागोपाठ दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 वर्ल्ड कप विजय होता. तसंच घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ आहे.
टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना फार विश्रांती मिळणार नाही, कारण 28 मार्च पासून आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होत आहे. 31 मे रोजी आयपीएल फायनल होईल, त्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरेल. आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीमचे जून ते डिसेंबर या कालावधीत व्यस्त वेळापत्रक असेल. जूनमध्ये, अफगाणिस्तान टीम एक टेस्ट आणि तीन वनडे सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा करेल. त्यानंतर, जुलैमध्ये, टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करेल, जिथे दोन्ही टीम पाच टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तीन वनडे सामने खेळतील.
advertisement
यानंतर, ऑगस्टमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. जर सरकारची परवानगी मिळाली तर भारतीय टीम सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करू शकते, जिथे दोन्ही टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळतील. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तटस्थ ठिकाणी तीन टी-20 सामने खेळले जातील.
त्यानंतर वेस्ट इंडिज तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा करेल. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणार आहेत, जिथे भारतीय क्रिकेट टीम देखील सहभागी होईल. भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा देखील करेल, जिथे तिन्ही फॉरमॅटमध्ये सीरिज खेळवली जाईल. या वर्षाच्या अखेरीस, श्रीलंकेची टीम वनडे आणि टी-20 सीरिजसाठी भारताचा दौरा करेल.
advertisement
अफगाणिस्तानचा भारत दौरा (जून)
टेस्ट मॅच : 6 जूनपासून, न्यू चंदीगड, सकाळी 9.30 वाजता
पहिला वनडे - 14 जून, धर्मशाला, दुपारी 1.30 वाजता\
दुसरी वनडे - 17 जून, लखनऊ, दुपारी 1.30 वाजता
तिसरी वनडे - 20 जून, चेन्नई, दुपारी 1.30 वाजता
भारताचा इंग्लंड दौरा (जुलै)
1 जुलै: पहिली टी-20, चेस्टर-ले-स्ट्रीट
4 जुलै: दुसरी टी-20, मँचेस्टर
advertisement
7 जुलै: तिसरी टी-20, नॉटिंगहॅम
9 जुलै: चौथी टी-20, ब्रिस्टल
11 जुलै: पाचवी टी-20, साउथहॅम्प्टन
14 जुलै: पहिली वनडे, बर्मिंगहॅम
16 जुलै: दुसरी वनडे, कार्डिफ
19 जुलै: तिसरी वनडे, लॉर्ड्स
भारताचा श्रीलंका दौरा (ऑगस्ट)
2 टेस्ट मॅच
भारताचा बांगलादेश दौरा (सरकारची परवानगी मिळाली तर)
3 वनडे मॅच (1, 3 आणि 6 सप्टेंबर)
advertisement
3 टी-20 सामने (9, 12 आणि 13 सप्टेंबर)
भारताचा अफगाणिस्तान दौरा (तटस्थ ठिकाण) | सप्टेंबर-ऑक्टोबर
3 टी-20 मॅच
वेस्ट इंडिजचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर)
3 वनडे सामने
5 टी-20 सामने
एशियन गेम्स 2026
यजमान: जपान
भारताचा न्यूझीलंड दौरा (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
2 टेस्ट मॅच
5 वनडे मॅच
5 टी-20 मॅच
श्रीलंकेचा भारत दौरा (डिसेंबर)
3 वनडे मॅच
3 टी-20 मॅच
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप संपला... आता टीम इंडिया मैदानात कधी उतरणार? BCCI ने शेड्यूल सांगितलं!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement