advertisement

वसई-विरारमधील हॉटेल्स बंद होणार? गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिकांना मोठा फटका

Last Updated:

वसई-विरार परिसरातील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे येत्या ४८ तासांत शेकडो हॉटेल्स शंभर टक्के बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

vasai virar news
vasai virar news
Vasai Virar Gas Issue : विजय देसाई, प्रतिनिधी, वसई-विरार : अमेरिका,इस्त्राईल व इराण यांच्यामधील युद्धाचा थेट परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे.सर्वसामन्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागला असून गॅस वितरण प्रणालीला त्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते आहे.यामुळे वसई-विरार परिसरातील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे येत्या ४८ तासांत शेकडो हॉटेल्स शंभर टक्के बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वसई तालुका हॉटेल असोसिएशनने प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे.
वसई-विरार पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खानावळींच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. नुकतीच या प्रश्नावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक देखील पार पडली, मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. अनेकांनी शेगड्यांवर अन्न शिजवणे सुरू केले असले तरी तेही मर्यादित असून गॅसचा पुरवठा पुढील ४८ तासांत सुरळीत झाला नाही, तर वसई-विरारमधील शेकडो हॉटेल्स आणि खानावळींना आपले कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
हॉटेल व्यवसाय हा या भागातील मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा उद्योग असून, हॉटेल्स बंद झाल्यास हजारो कामगार, आचारी तसेच होम डिलिव्हरी करणाऱ्या युवकांच्या उपजीविकेवर मोठे संकट येऊ शकते. त्याचबरोबर रोजच्या जेवणासाठी हॉटेल्सवर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागेल.
“परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये गॅसचा साठा संपत आला आहे. इंधनाशिवाय आम्ही व्यवसाय करू शकत नाही. प्रशासनाने आणि गॅस एजन्सींनी या प्रश्नाकडे आपत्कालीन स्थिती म्हणून लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात.”दरम्यान, वसई तालुका हॉटेल असोसिएशनने प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रीतम सिंग गोहनिया (सल्लागार वसई तालुका हॉटेल असोसिएशन) यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
वसई-विरारमधील हॉटेल्स बंद होणार? गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिकांना मोठा फटका
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement