पुणे ते नागपूर प्रवास सोपा होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार, वंदे भारतच्या वेळापत्रकात बदल
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vande Bharat Express: पुणे ते नागपूर वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
अमरावती: पुणे ते अजनी वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक 26101) वेळापत्रकात बदल केला आहे. पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस पुणे आणि अजनी (नागपूर) मार्गावर धावते. आता ही गाडी वेळेच्या काही मिनिटांपूर्वी धावणार असल्याची माहिती आहे.
मध्य रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन नागपूर विभागातील अकोला, बडनेरा आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर आतापर्यंतच्या वेळेपेक्षा आधी पोहोचणार असून त्या स्थानकावरून देखील लवकर सुटणार आहे. यामुळे प्रवाशांना केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इतर गाड्यांशी होणारी कनेक्टिव्हिटीही अधिक सुलभ होणार आहे.
advertisement
प्रमुख स्थानकांवरील वेळेत बदल
सुधारित वेळापत्रकानुसार, पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस अकोला आणि बडनेरा स्थानकांवर सुमारे 10 मिनिटे आधी पोहोचेल तसेच तेथून लवकर सुटेल. याशिवाय वर्धा स्थानकावरही ट्रेन नियोजित वेळेच्या आधी धावणार असल्याने नागपूर विभागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सकाळी किंवा संध्याकाळी पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल अधिक सोयीचा ठरणार आहे.
advertisement
प्रवाशांचा वेळ वाचणार, कार्यक्षमता वाढणार
या वेळापत्रकातील सुधारणेमुळे ट्रेनचा एकूण प्रवासकाल अधिक सुव्यवस्थित होणार आहे. तसेच वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन
26 डिसेंबर 2025 पासून हे सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. त्याआधी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वे, नागपूर विभागाकडून करण्यात आले आहे. यामुळे प्रवासादरम्यान होणारा गोंधळ टाळता येणार असून, प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
advertisement
वंदे भारतचे वेळापत्रक
view commentsही गाडी पुण्यातून सकाळी 6.25 मिनिटांनी सुटते. अकोला स्थानकावर दुपारी 2.50 मिनिटांनी पोहोचते. तेथून 2 मिनिटांनी सुटते. त्यानंतर बडनेरा येथे 3.58 मिनिटांनी पोहोचते. तेथून 2 मिनिटांनी सुटून वर्धा येथे सायंकाळी 5.08 मिनिटांनी पोहोचते. या वेळेत आता 10 मिनिटांचा बदल होणार आहे. गाडी 10 मिनिट आधी पोहोचणार असून तेवढीच लवकर सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 10:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
पुणे ते नागपूर प्रवास सोपा होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार, वंदे भारतच्या वेळापत्रकात बदल










