Manikrao Kokate: महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manikrao Kokate : सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी आढळेले माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर राज्यपालांनी मंजूर केला आहे
मुंबई: राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी आढळेले माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर राज्यपालांनी मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टात कोकाटे यांची याचिका सुनावणीस येण्याआधीच राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला. तर, दुसरीकडे नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून कोणत्याही क्षणी त्यांनी अटक होण्याची शक्यता आहे.
शासकीय सदनिका प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय विरोधात आल्यानंतर आणि विरोधकांसोबत भाजपकडून दबाव वाढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली. मात्र तरीही विरोधकांनी लक्ष्य केल्याने गुरुवारी अखेर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केली. त्यानंतर लगोलग कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
advertisement
राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने अशा काळात मंत्र्यांविरोधात अटक वॉरंट निघाल्याने सरकारवर मोठी टीका होत होती. तसेच अजित पवार कोकाटे यांना अभय देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने सरकारच्या प्रतिमेला धक्का लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट विचारणा केल्याने कोकाटे यांची कॅबिनेटमधून गच्छंती अटळ असल्याचे संकेत दिसू लागले होते.
advertisement
कोकाटे रुग्णालयात, पोलिसांकडून अटक कधी?
माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोकाटेंना अटक करण्यासाठी रात्रीच नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता कोकाटे यांना डिस्चार्जनंतर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manikrao Kokate: महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर










