advertisement

तिलकबरोबर केलेली मस्ती अर्शदीपला नडली, ड्रेसिंग रुममध्ये राडा, VIDEO आला समोर, चाहत्यांनी केलं ट्रोल

Last Updated:

अर्शदीप सिंगने तिलक वर्माची मस्करी करत व्हिडिओ बनवला, तिलक संतापला. सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करण्यात आलं. सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला.

News18
News18
टीम इंडियाच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये मज्जा मस्करी सुरू असते, त्याचे काही व्हिडीओ समोर येत असतात, बुधवारी रात्री ड्रेसिंग रूममध्ये मस्करीची चांगलीच कुस्करी झाली आहे. सामन्यानंतर अर्शदीपवर तिलक वर्मा चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनीही तिलक वर्माची बाजू घेऊन अर्शदीपला ट्रोल करायला सुरुवात केली. टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग आपल्या फिरकी आणि विनोदी स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर त्याचे मजेशीर व्हिडीओ चर्चेचा विषय असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अर्शदीप वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हिडिओमध्ये अर्शदीप आपल्याच संघातील सहकारी खेळाडू तिलक वर्मा याच्या दिसण्यावरून त्याची मस्करी करताना दिसत आहे. अर्शदीपची ही मस्करी स्वतः टिळक वर्मा आणि चाहत्यांनाही अजिबात आवडलेली नाही.
नेमकं काय घडलं व्हिडिओमध्ये?
advertisement
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग म्हणतो, "तिलक... याला आपण एवढं... नाही, तिलकला पाहू शकत नाही, तो खूप वाईट दिसतो." अर्शदीपचं हे वाक्य ऐकताच तिलक वर्माचा पारा चढला. त्याने अर्शदीपला आपली परवानगी न घेता व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई केली. तिलकच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, मात्र अर्शदीपने तरीही व्हिडिओ बनवणं आणि मस्करी करणं थांबवलं नाही.
advertisement
टीममधील मेंबर्सच्या लूकची मस्करी करण्याची अर्शदीपची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इशान किशनसोबत मिळून अर्शदीपने युवा खेळाडू साई सुदर्शनचीही अशाच प्रकारे थट्टा उडवली होती. त्यावेळीही सोशल मीडियावर अर्शदीपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. खेळाडूंमधील मैत्री एका बाजूला असली, तरी जाहीरपणे कुणाच्या दिसण्यावरून कमेंट करणे हे खिलाडूवृत्तीला साजेसं नसल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
advertisement
मैदानावर मात्र टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात जोरदार कामगिरी केली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 20 ओवरमध्ये 4 खेळाडू राखून 241 धावांचा डोंगर उभा केला. आफ्रिकेची टीम 7 खेळाडूंना बाद करून 210 धावांपर्यंतच पोहोचू शकली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
तिलकबरोबर केलेली मस्ती अर्शदीपला नडली, ड्रेसिंग रुममध्ये राडा, VIDEO आला समोर, चाहत्यांनी केलं ट्रोल
Next Article
advertisement
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement