Retinoids Use : चेहऱ्यावर रेटिनॉइड्स वापरताना 'हे' 3 रुल्स फॉलो करणं आवश्यक! डर्माटॉलॉजिस्टचा महत्त्वाचा सल्ला..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
3 golden rules to use retinoids on skin : रेटिनॉइड्स खूप फायद्याचे असतात. मात्र याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्वचेला जळजळ, कोरडेपणा येतो किंवा अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळतात. म्हणूनच रेटिनॉइड्स वापरण्याची योग्य पद्धत आणि काही रुल्स फॉलो करणं आवश्यक असतं
मुंबई : स्किन केअरमध्ये रेटिनॉइड्सना सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याचे कारणही तसेच आहे. रेटिनॉइड्स मुरुमांशी लढण्यास मदत करतात, चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करतात, त्वचेचा पोत सुधारतात आणि नव्या पेशी वेगाने वाढवतात. रेटिनॉइड्स खूप फायद्याचे असतात. मात्र याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्वचेला जळजळ, कोरडेपणा येतो किंवा अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळतात.
म्हणूनच रेटिनॉइड्स वापरण्याची योग्य पद्धत आणि काही रुल्स फॉलो करणं आवश्यक असतं. सोशल मीडियावर garekarsmddermatologyclinic या अकाऊंटवरून डर्माटॉलॉजिस्ट डॉ. गुरवीन वारैच यांनी काही महत्त्वाचे रुल्स सांगितले आहेत. चाल पाहूया.
काय असतात रेटिनॉइड्स?
रेटिनॉइड्स हे व्हिटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉलपासून मिळवलेले किंवा संबंधित संयुगे असतात, जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात. रेटिनॉइड्स पेशींचे नियमन करतात आणि त्वचेतील जळजळ कमी करतात. बऱ्याचदा डॉ ते प्रिस्क्राइब करतात किंवा बरेच लोक ते मेडिकलवरून स्वतःच घेतात. रेटिनॉइड्स त्वचेचे टॅनिंग कमी करण्यासाठी, बारीक रेषा कमी करण्यासाठी, सोरायसिसवर उपचार करण्यासाठी, त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि पिंपल्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. रेटिनॉइड्स वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. त्याचसोबत छिद्रे बंद करतात आणि पिगमेंटेशनही कमी करतात.
advertisement
रेटिनॉइड्स वापरण्याचे 3 गोल्डन रुल्स..
रुल 1 : डर्माटॉलॉजिस्टने सांगितले की, 'रोज रेटिनॉल, रेटिनल किंवा ट्रेटीनोइन असे रेटिनॉइड्स वापरू नयेत. तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त आठवड्यातून 3-4 वेळा लावू शकता. ते रात्रीच्यावेळी लावावे आणि इतर कोणत्याही क्रीमसोबत लावू नये. रेटिनॉइड्स इतर कोणत्याही सक्रिय सह एकत्र न करणे चांगले.'
रुल 2 : तुम्ही पहिल्यांदा रेटिनॉइड्स वापरत असाल, तुमची त्वचा कोरडी असेल किंवा तुम्हाला तुमचे रेटिनॉइड्स बदलायचे असेल तर तुम्ही ते मॉइश्चरायझरच्या नंतर लावणे योग्य आहे. या तीन परिस्थितींमध्ये आधी मॉइश्चरायझर लावा आणि नंतर रेटिनॉइड्स. एकदा सवय झाल्यास आणि तुम्हाला ते सूट झाल्यास तुम्ही ते थेट चेहऱ्यावर लावू शकता.
advertisement
advertisement
रुल 3 : डॉ. गुरवीन यांनी सर्वात महत्त्वाचा सल्ला हा दिला की, रेटिनॉल कमी वापराचं योग्य. त्या म्हणाल्या, 'जेव्हा रेटिनॉइड्सबद्दल आपण बोलतो तेव्हा तेव्हा कमीच जास्त असते.' त्यांनी सांगितले, तुम्ही कोणत्या प्रकारचे रेटिनॉइड वापरत आहात हे महत्त्वाचे नाही. फक्त रेटिनॉइड जास्त प्रमाणात ना वापरणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमच्या चेहऱ्यासाठी वाटाण्याच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा कमी प्रमाण पुरेसे असते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Retinoids Use : चेहऱ्यावर रेटिनॉइड्स वापरताना 'हे' 3 रुल्स फॉलो करणं आवश्यक! डर्माटॉलॉजिस्टचा महत्त्वाचा सल्ला..










