advertisement

Mumbai-Pune Expressway: महाकोंडी सुटण्याआधीच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; आता सिमेंट कंटेनरमुळे प्रवाशांसमोर नवं संकट

Last Updated:
मावळ (गणेश दुडम, प्रतिनिधी): आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकरच्या भीषण अपघातामुळे झालेली २८ तासांची महाकोंडी सुटते न सुटते, तोच आता प्रवाशांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे
1/7
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांच्या नशिबी असलेला 'वनवास' अद्याप संपलेला दिसत नाही. आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकरच्या भीषण अपघातामुळे झालेली २८ तासांची महाकोंडी सुटते न सुटते, तोच आता प्रवाशांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे.

2/7
घाटात सिमेंटने भरलेला एक अवजड कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीचा वेग पुन्हा एकदा मंदावला असून वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.

3/7
मंगळवारपासून सुरू असलेल्या गॅस गळतीमुळे हजारो प्रवासी आधीच बेहाल झाले होते. बुधवारी रात्री उशिरा टँकर हटवून रस्ता मोकळा करण्यात आला होता. २८ तासांचा बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी महामार्ग पोलीस शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, आता सिमेंटच्या कंटेनरने प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे.

4/7
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे सिमेंट वाहून नेणारा एक मोठा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला आहे. हा कंटेनर नेमका रस्त्यात बंद पडल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.

5/7
आधीच संथ गतीने सुरू असलेल्या वाहतुकीत या नवीन अडथळ्यामुळे पुन्हा एकदा 'ब्रेक' लागला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर लोणावळा येथे हा सिमेंटचा कंटेनर बंद पडला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा वाहतूक मंदावली आहे. तातडीने महामार्ग पोलिसांकडून हा कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

6/7
 "आधीच्या कोंडीतून आम्ही नुकतेच बाहेर पडलो होतो, पण आता पुन्हा गाडी एकाच जागी उभी आहे. एक्सप्रेसवेवर नेमकं चाललंय काय?" असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

7/7
जर तुम्ही सध्या मुंबई किंवा पुण्याच्या दिशेने निघणार असाल, तर घाटात पुन्हा अडकण्याची शक्यता आहे. कंटेनर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, जुना महामार्ग किंवा रेल्वेचा पर्याय निवडणे सध्या सोयीचे ठरेल.

Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement