Weather Alert: अवकाळी संकट टळलं, पण पुन्हा वारं फिरलं, महाराष्ट्रात आता वेगळाच अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 4 फेब्रुवारीला हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
सध्या महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू स्थिरता येताना दिसत आहे. मागील काही दिवसांच्या बदलत्या वातावरणानंतर आता राज्यात ढगाळ वातावरण निवळत असून कोरडे हवामान अनुभवास येत आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. थंडीचा प्रभाव काही भागांत सकाळपुरता मर्यादित राहणार असून दिवसा उकाडा वाढलेला जाणवणार आहे.
advertisement
कोकण किनारपट्टीवर आज हवामान प्रामुख्याने स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळच्या वेळेत सौम्य थंडी जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढणार आहे. समुद्रकिनारी भागात दमट वातावरण राहील. आज कोकणात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.आज कोकणात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात आज कोरडे आणि स्थिर हवामान राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरात सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, तर दिवसा तापमानात वाढ होणार आहे. आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो.या भागांमध्ये कमाल तापमान 32 ते 34 अंश, तर किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस राहणार आहे.या भागांमध्ये कमाल तापमान 33 ते 35 अंश, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड भागात सकाळच्या वेळेत गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर उष्णता वाढणार आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर परिसरात तापमानात चढउतार दिसून येतील. या भागांमध्ये कमाल तापमान 33 ते 35 अंश, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
advertisement
एकंदरीत, 4 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार असून थंडीचा प्रभाव कमी होत चालल्याचे चित्र आहे. सकाळी गारवा आणि दुपारी वाढणारा उकाडा असा मिश्र अनुभव नागरिकांना येणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यात उष्णतेचे संकेत दिसत असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.










