advertisement

अल्वपवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पुण्यातून घेतलं ताब्यात; आरोपीच्या खिशात त्या पुड्या, अन् फोनमधील ती 76 जणांची यादी पाहून खळबळ

Last Updated:

१४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सुनील ऊर्फ राठ्या गोपाळ राठोड (२८) याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. तो कोंढवे-धावडे परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

१४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत (प्रातिनिधिक फोटो)
१४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत (प्रातिनिधिक फोटो)
पुणे: एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास करणाऱ्या उत्तमनगर पोलिसांसमोर दुसराच मोठा खुला झाला. या कारवाईदरम्यान हाती अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट लागले आहे. प्रेमजाळ्यात ओढून मुलीचे अपहरण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याच्याकडे एमडी ड्रग्ज सापडले. ज्यातून शहरात पसरलेल्या एका मोठ्या जाळ्याचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी ८.१९ ग्रॅम एमडी जप्त केले असून एकूण ८ आरोपींपैकी ४ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अपहरणाच्या गुन्ह्यातून रॅकेटचा उलगडा
१४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सुनील ऊर्फ राठ्या गोपाळ राठोड (२८) याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. तो कोंढवे-धावडे परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्या झडतीत एमडीच्या पुड्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचे साथीदार राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६) आणि शुभम संतोष दहिभाते (२८) यांनाही अटक केली.
advertisement
लाखोंची उलाढाल आणि ७६ जणांची यादी
पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मोबाईलमधील आर्थिक व्यवहारांवरून ड्रग्ज विक्रीतून सुमारे १० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे २५० ते ३०० जणांसोबत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे तपासात समोर आले आहे. ड्रग्ज घेणारे आणि विकणारे अशा ७६ जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
advertisement
पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह-आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभम दहिभाते याच्या घरातूनही पोलिसांनी ५.१२ ग्रॅम एमडी जप्त केले आहेत. या रॅकेटचे धागेदोरे आणखी कोणाशी जोडलेले आहेत, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे आणि पथक करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अल्वपवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पुण्यातून घेतलं ताब्यात; आरोपीच्या खिशात त्या पुड्या, अन् फोनमधील ती 76 जणांची यादी पाहून खळबळ
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement