advertisement

45 वर्षांपासूनची ओळख म्हणून विश्वास ठेवला; मुंबईतील दाम्पत्याने 55 लाखाला गंडवले, नेमकं काय घडलं?

Last Updated:

बोरीवलीतील एका महिलेची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
मुंबई : झटपट आणि भरघोस नफा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. ओळखीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून योग्य पडताळणी न करता गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, याचाच प्रत्यय मुंबईत पुन्हा एकदा आला आहे. बोरीवलीतील एका महिलेची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय प्रकरण?
बोरीवलीतील रहिवासी असलेल्या मनीषा निकम यांचे खार पश्चिमेतील प्रवीण नार्वेकर आणि त्यांची पत्नी प्रमिला नार्वेकर यांच्याशी सुमारे 45 वर्षांपासून ओळखीचे संबंध होते. या ओळखीचा फायदा घेत नार्वेकर यांनी प्रांजल मॅनेजमेंट सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून सोन्याच्या व्यवहारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांनी निकम यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
advertisement
सप्टेंबर 2025 मध्ये 55 लाख रुपये गुंतवल्यास अवघ्या तीन महिन्यांत 95 लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावर विश्वास ठेवत 5 सप्टेंबर रोजी दोन्ही पक्षांमध्ये कर्ज करार करण्यात आला आणि त्याच दिवशी 5 लाख रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी 50 लाख रुपये आरटीजीएसद्वारे नार्वेकर यांच्या खात्यात जमा करण्यात आले. विश्वास बसावा म्हणून नार्वेकर यांनी 25 लाख रुपयांचा सिक्युरिटी चेकही दिला.
advertisement
मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतर पैसे परत देण्याबाबत नार्वेकर दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी 95 लाख रुपयांचा चेक दिला, मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स झाला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निकम यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 31 मार्च रोजी प्रवीण नार्वेकर आणि प्रमिला नार्वेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
45 वर्षांपासूनची ओळख म्हणून विश्वास ठेवला; मुंबईतील दाम्पत्याने 55 लाखाला गंडवले, नेमकं काय घडलं?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement