Bigg Boss Marathi 6 च्या घरातील वातावरण टाइट! राकेश बापट आणि रुचिता जामदारमध्ये जोरदार फाइट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar Raqesh Bapat Fight : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राकेश बापट आणि रुचिता जामदारमध्ये जोराचं भांडण झाल्याचं पाहायला मिळतं.
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील वातावरण आता अधिकच टाइट होत चाललं आहे. सध्या सुरू असलेल्या पापड टास्कदरम्यान वाद चांगलाच पेटला आहे. रुचिता जामदारचं आधी करण सोनावणे आणि आता राकेश बापटसोबत जोराचं भांडण झालं आहे. हा वाद इतका टोकाला गेला की राकेशने एक तर ती घरात राहिल किंवा मी, असंच बिग बॉसला सांगितलं आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राकेश बापट आणि रुचितामध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळतं. राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडतात. घरातील इतर सदस्य दोघांनाही शांत करण्याचा, आवरण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रुचिता म्हणजे ज्यांना खेळायचं आहे, त्यांनी खेळायचं नाही त्यांनी घरी जायचं. यानंतर राकेश चवताळलेला दिसतो आणि रुचिताला फालतू बोलतो. रुचिताही त्याला फालतू बोलते. यानंतर अनुश्री मधे पडलेली दिसते. अनुश्री रुचिताला तू तुझ्या तोंडाने का बोलतेस, असं म्हणते. यानंतर रुचिता हा नाटकी आहे, असं सांगते.
यानंतर राकेश कॅमेऱ्यासमोर येतो आणि बिग बॉसला सांगतो की एक तर या घरात ही राहिल किंवा मी. त्यानंतर शेवटी तो कोणती तरी वस्तू रागात फेकताना दिसतो. आता राकेश आणि रुचिता यांच्यामधील वादाचं नेमकं कारण काय ते मात्र एपिसोडमध्येच समजेल.
advertisement
रुचिता आणि करणमध्ये फाइट
याआधीच्या एपिसोडमध्ये रुचिता आणि करणमध्ये फायटिंग झाल्याचं पाहायला मिळालं. करण रुचितावर पीठ टाकतो यानंतर रुचिता त्याला मारते. यावर करण ए मारतेस काय, देऊ का? असं म्हणतो. त्यावेळी इतर सदस्य मधे पडतात आणि दोघांनाही एकमेकांना मारण्यापासून अडवतात.
advertisement
कॅप्टनीच्या उमेदवारासाठी असलेल्या पापड टास्कमध्ये हा सगळा राडा झालेला पाहायला मिळतो आहे. रुचिताचं सततचं असं वागणं पाहून प्रेक्षकही संतापले आहेत. बहुतेकांनी रुचिताला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. तसंच काहींनी राकेशलाही ट्रोल केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 9:05 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील वातावरण टाइट! राकेश बापट आणि रुचिता जामदारमध्ये जोरदार फाइट









