advertisement

खरंच सागर कारंडे Bigg Boss Marathi 6 च्या घरात मळत होता तंबाखू? अखेर टीम कडून खरंखोटं समोर

Last Updated:

Sagar Karande Bigg Boss Marathi 6 : सागर कारंडे बिग बॉस मराठी 6 च्या घरात खरंच तंबाखू खात होता का? सगळ्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर अखेर बिग बॉसच्याच टीमकडून देण्यात आलं आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी सीझन 6 जोरदार सुरू आहे. या सीझनमध्ये प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडे देखील सहभागी झाला आहे. सागर कारंडे घरात उत्तम खेळताना दिसतोय. घरात त्याची भांडणं होतं आहेत, मज्जा, मस्ती धम्माल आणि सगळ्यांचं मनोरंजन करताना सागर कारंडे दिसत आहे. दरम्यान सागर कारंडेचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात सागर कारंडे बिग बॉसच्या घरात बाथरूममध्ये तंबाखू मळताना दिसला होता. राधा पाटिल देखील तिथे त्याच्याबरोबर दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर खरंच सागर कारंडे घरात तंबाखू खात होता का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. अखेर या सगळ्या प्रश्नांवर बिग बॉस मराठीचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगांवकर यांनी सत्य सांगितलं.
एका मुलाखतीत बोलताना केतन माणगांवकर म्हणाले, तुम्ही सागरचा व्हिडीओ नीट पाहिला तर राधा पाटिल आणि सागर यांच्यात एक मजेशीर स्किट चालू होतं. त्यात सागर निळू फुले यांचा अभिनय करत होता. तो तंबाखू खात नव्हता. नॅशनल टेलिव्हिजनवर अशी कोणतीही गोष्ट दाखवली जाऊ शकत नाही हे सर्वांना ठाऊक आहे.
advertisement
बिग बॉसच्या घरातील स्मोकिंग झोनबाबतही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, शोच्या फॉरमेटनुसार, बिग बॉसच्या घरात एक स्मोकिंग झोन असतो. स्पर्धकांना स्मोकिंग झोनच्या आत जाऊन सिगारेट ओढता येते. घरातील इतर कोणत्याही भागात सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे. तसंच बिग बॉसच्या घरात दारू पिण्यासही मनाई आहे. बिग बॉसच्या घरात सिगारेट ओढण्याव्यतिरिक्त इतर कोणतंही व्यसन चालत नाही.
advertisement
केतन माणगांवकर यांच्या प्रतिक्रियेनंतर सागर कारंडे बिग बॉस मराठीच्या घरात तंबाखू मळत नव्हता हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील अनेक प्रश्न दूर झाले आहेत.
बिग बॉस मराठी 5 चे स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादांनी सागर कारंडेचा व्हिडीओ शेअर करत तो तंबाखू मळत असल्याचं सांगितलं होतं. पण ते खरं की खोटं मला माहिती नाही, मला व्हिडीओ दिसला तो मी तुम्हाला दाखवला असं ते म्हणाले होते. त्यानंतरच याची सोशल मीडियावर चर्चा रंगली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
खरंच सागर कारंडे Bigg Boss Marathi 6 च्या घरात मळत होता तंबाखू? अखेर टीम कडून खरंखोटं समोर
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement