advertisement

ए मारतेस काय, देऊ काय! Bigg Boss Marathi 6 च्या घरात फुल्ल ऑन राडा; पापडासाठी झापड

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात चौथ्या आठवड्यात 24 व्या दिवशी कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी पापड टास्क देण्यात आला. यावेळी घरात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून वाद सुरू झाला. भांडणं, शिवीगाळ काय काय नाही पाहिलं आणि आता हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. आज 24 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात फुल्ल ऑन राडा झाला आहे. पापडाच्या टास्कमध्ये झापड लगावायलाही सदस्य मागे हटले नाहीत.
चौथ्या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी नॉमिनेशन झालं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी कॅप्टनीसाठीचा टास्क आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पापडाचा टास्क देण्यात आला आहे. या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात या पापड टास्कमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एकमेकांचं पीठ, पापड पळवले जात आहेत, एकमेकांच्या अंगावर पीठ ओतलं जात आहे. कुणी कुणाला पकडून ठेवलं आहे, तर कुणी कुणाला मारलंही आहे. रुचिता जामदार जिच्यावर करण सोनावणेने पीठ ओतलं त्यानंतर रुचिताने त्याला झापड लगावली आणि करण चवताळल्याचं दिसतं आहे. रुचिताना हात उगारताच करणचा पारा चढला आणि तोही तिला मारायला गेल्याचं दिसतं. ए मारतेस काय, देऊ काय? असं तो तिच्यावर मोठ्याने ओरजतो. त्याने हात उचल्याचंही दिसतं.
advertisement
बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य तिथं येतात आणि त्या दोघांना रोखतात. विशाल करणला रोखून शांत करताना दिसतो आहे. आता बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी उमेदवारीचे पापड लाटले जाणार की त्यांचा चक्काचूक होणार? पुढे नेमकं काय घडणार? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.
advertisement
advertisement
दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर येताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. बहुतेकांनी रुचिताला टार्गेट केलं आहे. ती भंगार आहे तिला घराबाहेर काढा, पुढचा नंबर तिचाच लावा अशा कमेंट अनेक युझर्सनी केलं आहे. आर्यानी निक्कीला मारलं होतं तर तुम्ही तिला बाहेर काढलं होतं, आता हिलापण काढा बाहेर असं एका युझरने म्हटलं आहे. काहींनी करणलाही ट्रोल केलं. 'तू त्याच लायकीच सोनावणे बाई बाई चाळे सगळे मग खाणार ना मार', अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर काहींनी रुचिता सगळे भंगार समजता पण खरा गेम तर ती खेळते, असं म्हणत पाठिंबा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ए मारतेस काय, देऊ काय! Bigg Boss Marathi 6 च्या घरात फुल्ल ऑन राडा; पापडासाठी झापड
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement