Nashik News: नाशिककरांनो सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गांमध्ये बदल, कसे असतील मार्ग?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेले कामं वेळेत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली असली तरी जोपर्यंत कामे पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बसेस अन्य पर्यायी मार्गाने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या कामांमुळे नाशिककरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे पोलीस प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात वाहतुकसेवा पुरवणाऱ्या सिटीलिंक बससेवेच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले जाणार आहे. त्यामुळे एक दोन नाही तर, काही बसफेऱ्यांच्या मार्गात बदल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेले कामं वेळेत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली असली तरी जोपर्यंत कामे पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बसेस अन्य पर्यायी मार्गाने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक बससेवा वेगवेगळ्या मार्गांवरून वळवल्या जाणार आहेत. पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, सिटीलिंक बसच्या तब्बल 25 बसेसच्या मार्गांमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामध्ये नाशिक रोडवरून सुटणाऱ्या बसेसचा समावेश आहे.
advertisement
बदल करण्यात आलेल्या बसेस कोणत्या?
129, 130, 146, 148, 166, 201, 202, 203, 207, 208, 210, 211, 231, 236, 243, 242, 247, 251, 260, 263, 264, 266 आणि 298 या क्रमांकाच्या 23 बसेस नाशिक रोड रेल्वे स्टेशन या बस स्टॉपवरून सुटल्यानंतर पुढे आंबेडकर नगर, विजय ममता सिग्नल, अशोका मार्ग, भारतनगर, साईनाथ नगर, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक, इंदिरानगर बोगदा, महामार्ग, मुंबई नाका, उर्दू शाळा गंजमाळ, शालीमार मार्गे आपल्या नियोजित मार्गाने मार्गस्थ होणार आहेत. हा मार्ग जाताना आणि येताना दोन्हींचाही एक सारखाच असणार आहे.
advertisement
याशिवाय, 104 आणि 259 या दोन मार्गावरील बसेस सुद्धा सुरुवातीला नियोजित मार्गे पुढे पाथर्डी गाव, टाकळीकडे जाताना उर्दू शाळा, आयेशा नगर, नागजी मार्गे जातील आणि पुढे पुन्हा आपल्या नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील तसेच त्याच मार्गाने पुन्हा येतील. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार, बदल करण्यात आलेल्या दोन्हीही मार्गांमध्ये बदल करण्यात आलेल्या आहेत. मार्गांबदले बदल पुढचे निर्देश मिळेपर्यंत कायम असणार आहेत. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 4:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककरांनो सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गांमध्ये बदल, कसे असतील मार्ग?







