advertisement

Pakpuri Recipe : उन्हाळ्यात आंबट-गोड चवीची बनवा खास पाकपुरी, सोप्पी रेसिपी

Last Updated:
पूर्वी हे पदार्थ घराघरात सहज बनवले जात असत, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे काही पदार्थ मागे पडले. तरीही त्यांची चव मात्र आजही जिभेवर रेंगाळते.
1/7
आजकाल पुन्हा एकदा पारंपरिक पदार्थांकडे लोकांचा ओढा वाढताना दिसत आहे. जुन्या काळातील चव आणि साधेपणा जपणारे पदार्थ आजही तितकेच आवडतात. अशाच चविष्ट आणि खुसखुशीत पदार्थांपैकी एक म्हणजे पाकपुरी. आंबट-गोड चवीची ही पाकपुरी अगदी कमी वेळात आणि घरातील सहज उपलब्ध साहित्यापासून बनवता येते.

2/7
पूर्वी हे पदार्थ घराघरात सहज बनवले जात असत, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे काही पदार्थ मागे पडले. तरीही त्यांची चव मात्र आजही जिभेवर रेंगाळते. अमरावतीतील गृहिणी रसिका शेळके यांनी सांगितलेली पाकपुरीची ही सोपी रेसिपी तुम्हीही घरी करून पाहू शकता.

3/7
पाकपुरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, रवा, साखर, दही, वेलची पूड, चिमूटभर मीठ, आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.

4/7
पाकपुरी बनविण्याची कृती: सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि रवा घेऊन त्यात मीठ घालावे. त्यानंतर दही टाकून मिश्रण मळून घ्यावे. हे पीठ खूप कडक किंवा खूप सैल न ठेवता मध्यम मऊसर ठेवावे. मळलेले पीठ थोडावेळ झाकून ठेवावे.

5/7
दरम्यान, पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर आणि थोडे पाणी घेऊन गरम करावे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर एकतारी पाक तयार करावा.

6/7
पाक तयार झाला की त्यात वेलची पूड घालून बाजूला ठेवावा. यानंतर मळलेल्या पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्या गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. तळलेल्या गरम पुऱ्या लगेच तयार पाकात टाकून थोडावेळ मुरु द्याव्यात.

7/7
सुमारे पाच मिनिटांनी त्या पाकातून काढून घ्याव्यात. अशा प्रकारे कुरकुरीत, आंबट-गोड आणि चविष्ट पाकपुरी तयार होते. तुम्हीही घरच्या घरी हा पारंपरिक पदार्थ करून पाहा आणि जुन्या चवीचा आनंद पुन्हा अनुभवा.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement