advertisement

Ashok Kharat: अशोक खरातची पाठराखण करणारी बायको आता अडचणीत, शिर्डीतील प्रकरणात अटक होण्याची शक्यता

Last Updated:

शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नीसह ३ जणांविरोधात शिर्डी परिसरात बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
राहाता :  बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. अशोक खरातची किळसवाणे कृत्य समोर येऊन सुद्धा त्याच्या बायकोनं पाठराखण केली होती. पण, आता जमीन बळकावल्या प्रकरणी खरातची बायको आता पुरती अडचणीत सापडली असून शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे. लवकरच पोलीस खरातच्या बायकोला अटक करण्याची शक्यता आहे.
अशोक खरात याने  शिर्डीतील शेतकऱ्याची जमिन बळकावल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.  अटक केलेल्या दोन आरोपींना राहाता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह पाच जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या पाशात अडकवून त्याची कोट्यावधीची जमीन खरातने बळकावली आहे.. या प्रकरणात लवकरच शिर्डी पोलीस खरातच्या पत्नीला अटक करण्याची शक्यता आहे.
advertisement
अशोक खरात व त्याच्या पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नीसह ३ जणांविरोधात शिर्डी परिसरात बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  फसवणूक व सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केली आहे.  पाच पैकी दोघांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर अशोक खरात आधीपासूनच नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे.  दोघा आरोपींना न्यायालयात हजर केल असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्याचा सविस्तर तपास शिर्डी पोलीस करत आहे, जे काही पैशांचे व्यवहार आहे, जो तक्रारदार आहे, त्याला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते. एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते. आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली आहे.शिर्डी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. एकूण अशोक खरात, त्याची पत्नी आणि आणखी ३ जण आहे. यापैकी दोघांना अटक केली आहे.  अशोक खरातला देखील न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेणार आहोत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे .यांनी दिली.
advertisement
'अटकेच्या कारवाई पोलीस करू शकता'
"जे अटक आरोपी आहे अरविंद भावके, यांचा प्रत्यक्ष कोणताही सहभाग नसल्याचं समोर आलं होतं. विसंगती आणि त्रुटी हे कोर्टापुढे सादर करण्यात आलं आहे.  दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. त्याच्यामध्ये पोलिसांनी ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपीच्या वतीने करण्यात आलेली युक्तीवाद होता, प्रथमदर्शीनी आरोपीचं प्रत्यक्ष कोणताही व्यवहाराशी संपर्क आढळला नाही. त्यामुळे कोर्टाने फक्त गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  सावकारीचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामध्ये अशोक खरात आणि त्याच्या बायकोचं नाव आहे.  त्यामुळे अशोक खरात याच्या बायकोला अटक होऊ शकते, या प्रकरणात नाव असून गुन्हे दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात हे त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे जास्त भाष्य करता येणार नाही, अशी माहिती आरोपी वकिलचे व्यंकटेश खिस्ते यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: अशोक खरातची पाठराखण करणारी बायको आता अडचणीत, शिर्डीतील प्रकरणात अटक होण्याची शक्यता
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement