Tukaram Mundhe: राज्यात उलथापालथ! IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 21 वर्षात 24 वं Transfer; आता कोणती जबाबदारी सांभाळणार?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Tukaram Mundhe Transfer : 21 वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही 24 वी बदली झाली आहे.
मुंबई : प्रशासकीय सेवेतील अत्यंत डॅशिंग, शिस्तप्रिय आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 24 वेळा बदली होण्याचा एक आगळावेगळा पण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विक्रम मुंढे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात 'सिंघम' अशी ओळख असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना,मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होण्याचे सत्र यंदाही कायम राहिले आहे.
advertisement
21 वर्षांच्या सेवेत 24 बदल्या
तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तिथे ते कामात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर त्यांचा भर असतो. दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी विभागातील अनेक प्रलंबित प्रकरण मार्गी लावले आणि वर्षानुवर्षे चालणारे गैरप्रकार चव्हाट्यावर आणले होते. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य जनतेला नेहमीच दिलासा मिळतो. कार्यालयात वेळेवर न येणारे कर्मचारी असोत किंवा राजकीय दबावाखाली चुकीचे काम करणारे अधिकारी मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सत्ताधाऱ्यांच्या पसंतीस उतरत नाहीत. यामुळेच 21 वर्षांच्या सेवेत 24 बदल्या झाल्या आहे.
advertisement
IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द
- ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
- सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
- जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
- मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
- जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
- जून 2010 - सीईओ, कल्याण.
- जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
- सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
- नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
- मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
- मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
- फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
- नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
- डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
- जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
- ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
- जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
- सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
- एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
- जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
- जून 2024 - विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग
- ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय
advertisement
आता आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सारख्या संवेदनशील विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात या विभागात ते कोणती 'मुंढे स्टाईल' शिस्त लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 5:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tukaram Mundhe: राज्यात उलथापालथ! IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 21 वर्षात 24 वं Transfer; आता कोणती जबाबदारी सांभाळणार?









