advertisement

राज सर थँक्यू! पोलिसांना जे जमलं नाही ते मनसैनिकांनी केलं, इन्फ्लुएन्सरला मिळाला दिलासा, नेमकं काय झालं?

Last Updated:

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 4 लाखांचा कॅमेरा ती कॅबमध्ये विसरली होती. पोलिसांनीही मदतीला नकार दिला. इन्फ्लुएन्सरनं थेट मनसेची मदत घेतली.

News18
News18
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबरोबर एक धक्कादायक घटना घडली. चार लाखांचा कॅमेरा ती कॅबमध्ये विसरली. कॅब ड्रायव्हर आणि त्यानंतर पोलिसांनीही तिला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अखेर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मदतीला राज ठाकरे धावून झाले. 4 लाखांचा कॅमेरा 24 तासांत तिच्या हातात आणून दिला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने व्हिडीओ शेअर करत मनसे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फ्रुटवाला नर्गिस हिच्यासोबत हा प्रकार घडला. सुमारे 4 लाख रुपये किमतीचा कॅमेरा कॅबमध्ये विसरली.  मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत हा मौल्यवान कॅमेरा परत मिळाल्याने नर्गिसने मनसे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. नर्गिसने दिलेल्या माहितीनुसार, ती एका कॅबने प्रवास करत असताना तिचा महागडा कॅमेरा गाडीतच राहिला. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर तिने संबंधित कॅब चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कॅमेरा परत देण्यास नकार दिल्याचा आरोप नर्गिसने केला आहे.
advertisement
या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी नर्गिसने चेंबूर, MIDC आणि RCF या पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर दावा तिने केला. त्यामुळे ती पूर्णपणे हतबल झाली होती.
advertisement
यानंतर तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार नर्गिसने मनसेकडे मदत मागितली. मनसेच्या वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांनी तपास करून नवी मुंबई परिसरात कॅब चालकाचा शोध लावला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चालकाच्या घराची झडती घेतली आणि कॅमेरा ताब्यात घेतला. अवघ्या 24 तासांत नर्गिसचा मौल्यवान कॅमेरा परत मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
[video width="478" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-31-at-4.49.30-PM-2026-03-9df6010bf9694ff5dfd025233c291fea.mp4"][/video]
कॅमेरा परत मिळाल्यानंतर नर्गिसने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मनसे आणि विशेषतः राज ठाकरे यांचे आभार मानले. "मनसेमुळे मला माझा कॅमेरा परत मिळाला. मी त्यांची खूप आभारी आहे", असं तिनं सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
राज सर थँक्यू! पोलिसांना जे जमलं नाही ते मनसैनिकांनी केलं, इन्फ्लुएन्सरला मिळाला दिलासा, नेमकं काय झालं?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement