महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनींच्या वक्तव्याने वाद पेटला; इतिहास तज्ज्ञांनी दिला पुरावा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला आहे.
मुंबई : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला आहे.
मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी.
advertisement
नेमकं काय म्हणाले इंद्रजीत सावंत?
तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई आहेत. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असे वक्तव्य करू नयेत असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणालेत..
महाराणी ताराराणी यांचा इतिहास बदनाम करणाऱ्यांच्या षड्यंत्रात या जैन मुनींनी सहभागी होऊ नये. जैन समाज हा शांतता प्रिय समाज आहे, त्यामुळे महापुरुषांच्या नावावरून त्यांनी वाद निर्माण करू नयेत. महाराणी ताराराणी यांच्या खरा इतिहास समोर आल्यानंतर त्यांच्या पराक्रमाला समांतर कोणीही नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्याबाबत नव्याने सुरू झालेली ही चर्चा त्यांच्या पराक्रमामध्ये बाधा आणणारी आहे, असेही इंद्रजीत सावंत म्हणाले.
advertisement
जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घाला...
आचार्य नयन पद्मसागर पुढे म्हणाले की, कोणत्याही गल्लीत जा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , संत नामदेव ऐकू येतील. आमचा धर्म कोणताही असो पण भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे. जैन धर्म कोणत्या जातीत भेद मानत नाही. संविधान अखंड भारत बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. संविधानमध्ये कोणत्याही धर्माला वगळले नाही. मात्र जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 6:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनींच्या वक्तव्याने वाद पेटला; इतिहास तज्ज्ञांनी दिला पुरावा






