advertisement

Navi Mumbai News: वाशी ब्रिजच्या दुरूस्तीचे काम हाती! नवी मुंबईकरांचे घरी जाताना हाल होण्याची शक्यता

Last Updated:

मुंबईवरून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाशी ब्रिजवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

News18
News18
नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाशी ब्रिजवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज आणि उद्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मंगळवारी ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीसाठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरी जाताना शक्य असेल तर, नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर निघण्याचा प्रयत्न करा. कारण आज मोठ्या प्रमाणावर वाशी पुलावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
वाशी टोल प्लाझाच्या आधी ठाणे खाडीवरून जाणारा वाशी पुल बंद असणार आहे. सध्या एका बाजूनेच दोन्हीही बाजूंची वाहतूक केली जात आहे. सुरू असलेल्या जॉइंट दुरुस्तीच्या कामासाठी पुलाची एक बाजू बंद करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकार्‍यांनी मिड डे वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील दोन्हीही लेन कामाकरिता बंद करण्यात आल्या आहेत. हे काम सध्या सुरू असून, या दोन्हीही लेन बुधवारपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
तात्पुरत्या बंदमुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जेव्हा या मुख्य मार्गावर वाहतूक जास्त असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर उशीर होण्याची शक्यता आहे. वाहतुक पोलिसांकडून प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की, या मार्गाचा वापर न करत इतरत्र मार्गांवरून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. गैरसोय टाळण्यासाठी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा विचार करावा. सायन- पनवेल महामार्गावरील (नवी मुंबईच्या दिशेने) वाशी टोल प्लाझाच्या आधी असलेल्या वाशी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.
advertisement
जॉइंटची दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात आल्यामुळे ब्रिज बंद करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत वाशी ब्रिज पुन्हा प्रवाशांच्या सोयीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News: वाशी ब्रिजच्या दुरूस्तीचे काम हाती! नवी मुंबईकरांचे घरी जाताना हाल होण्याची शक्यता
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement