आम्हाला न्याय द्या! RB च्या फॅमिलीने जोडले हात; Bigg Boss Marathi 6 च्या घरात राकेशशी राडा विशालला भोवणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat Family : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील राकेश आणि विशालमधील राडा आता खूपच पेटला आहे. बापट कुटुंबाने विशालविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
तरी विशाल कोटियनने हा नियम वारंवार मोडला आहे. शोच्या सुरुवातीपासूनच हे सुरू असून यावेळी त्याने मर्यादा ओलांडल्या आहेत. हा शोच्या आचारसहितेचा गंभीर आणि अस्वीकार्य भंग आहे. याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार केवळ शब्दिक चिथावणीपुरता मर्यादित नव्हता. हेतुपुरस्सर शारीरिक चिथावणी देण्याली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या आणि परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली, जे नियमांचं आणखी एक मोठं उल्लंघन आहे, असं बापट कुटुंब म्हणालं.
advertisement
शोमध्ये शारीरिक आक्रमकतेविरुद्ध किरकोळ कारवाई करण्यात आली असल्याचं आम्ही पाहिलं आहे. मात्र इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो गंभीर कायदेशीर भंग झाला आहे, तो अद्याप दुर्लक्षित राहिला आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत. त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं बापट कुटुंबाने सांगितलं.
advertisement
advertisement
राकेशने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता. रितेश देशमुख यांचा या शो मधील सहभागामुळे हा मंच सुसंस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबासोबत पाहण्यास योग्य राहील, असा त्यांचा विश्वास होता. संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली आहे. घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक बाबींवरून त्यांनी कधीही कोणाचीही अवहेलना केलेली नाही. आमचे कुटुंब, मित्र आणि चाहते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत, असं कुटुंबाने सांगितलं आहे.
advertisement







