Marriage Scam: पहिली पत्नी घरी, नाशिकला जाऊन केलं कांड, कोल्हापूरच्या तरुणाचे कारनामे पाहून सगळे हैराण!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Marriage Fraud: गेल्या तीन वर्षांपासून हा लुटीचा प्रकार सुरू होता. वारंवार पैशांची मागणी आणि नोकरीबाबत टाळाटाळ होऊ लागल्याने पीडितेच्या कुटुंबाला संशय आला.
नाशिक : पुण्यातील नामांकित विद्यापीठात मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असल्याचे सांगून एका महाठगाने मोठं कांड केलं. पहिल्या लग्नाची माहिती लपवून नाशिकच्या युवतीशी विवाह केला. केवळ लग्नच नाहीतर पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 44 लाख 54 हजार रुपयांना गंडा घातला. सातपूर परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
संशयित 32 वर्षीय महेश वडार हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आहे. त्याने 2023 मध्ये सातपूर येथील पीडित महिलेशी विवाह केला होता. आपण विद्यापीठात बड्या पदावर कार्यरत असल्याचे भासवून त्याने सुरुवातीला विश्वास संपादन केला. लग्नानंतर त्याने पत्नीचे 6 तोळे सोन्याचे दागिने स्वतःच्या नावाने गहाण ठेवले. इतकेच नव्हे तर, पत्नीच्या मोबाईलचा वापर करून विविध लोन ॲप्सद्वारे परस्पर कर्जही उचलले.
advertisement
पतीला सोडून ‘त्याच्या’सोबत गेली, 20 दिवस राहिली अन्..., संभाजीनगरच्या ‘त्या’ प्रकरणाला धक्कादायक वळण
नातेवाईकांनाही सोडले नाही!
महेशने त्याचे साथीदार शुभम आणि अजय यांच्या मदतीने पीडितेच्या संपूर्ण कुटुंबाला जाळ्यात ओढले. विद्यापीठात शिपाई, लिपिक आणि प्रकल्प समन्वयक पदावर भरती करून देतो तसेच कॅन्टीनचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले. यासाठी त्याने चक्क बनावट नियुक्तीपत्रे आणि खोटा करारनामा तयार करून सर्वांचा विश्वास संपादन केला.
advertisement
कोणाची किती लूट झाली?
- पीडितेचा मोठा भाऊ: 10 लाख 5 हजार रुपये
- धाकटा भाऊ: 6 लाख 82 हजार रुपये
- बहिणीचा मुलगा: 9 लाख 61 हजार 600 रुपये
- दाजी: 5 लाख 97 हजार रुपये
- इतर नातेवाईक व मित्र: सुमारे 8 लाख रुपये
तीन वर्षांपासून सुरू होता खेळ
गेल्या तीन वर्षांपासून हा लुटीचा प्रकार सुरू होता. वारंवार पैशांची मागणी आणि नोकरीबाबत टाळाटाळ होऊ लागल्याने पीडितेच्या कुटुंबाला संशय आला. चौकशीअंती महेश हा आधीच विवाहित असल्याचे आणि त्याने दिलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Marriage Scam: पहिली पत्नी घरी, नाशिकला जाऊन केलं कांड, कोल्हापूरच्या तरुणाचे कारनामे पाहून सगळे हैराण!








