Navi Mumbai : 6 वर्षांचा वनवास संपला! नवी मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; प्रवास झाला आरामदायी
Last Updated:
Best Bus Depot : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाशी येथील अत्याधुनिक बस डेपो अखेर कार्यान्वित झाला आहे. 190 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या डेपोमुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशीकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा वाशी बस डेपो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून सोमवार संध्याकाळपासून तो अधिकृतपणे सुरु करण्यात आला आहे.
प्रवास झाला सुपरफास्ट आणि आरामदायी
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नूतनीकरण आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता हा प्रश्न कायमचा सुटल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. सुमारे 190 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा अत्याधुनिक 21 मजली वाशी बस डेपो दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झाला होता. विविध कारणांमुळे उद्घाटन रखडले असले तरी आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने पुढाकार घेत हा डेपो थेट प्रवाशांसाठी खुला केला. या निर्णयामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
डेपो बंद असताना वाशी-कोपर खैरणे या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून बस पकडण्याची वेळ प्रवाशांवर येत होती. ऊन, पाऊस आणि वाहतुकीच्या धोक्यातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आता मुंबई, पनवेल आणि वाशी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या बसेस नव्या डेपोमधूनच सुटणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
या भव्य इमारतीत खालचे पाच मजले आणि वरचे सोळा मजले असून सुमारे 75 टक्के जागा बस वाहतुकीसाठी राखीव आहे. उर्वरित भागात रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल आणि कार्यालयांसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : 6 वर्षांचा वनवास संपला! नवी मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; प्रवास झाला आरामदायी









