Astrology: हाता-तोंडाशी आलेला घास..! शनी, मंगळ, गुरू, राहु-केतूचा खेळ 2 राशींची गणितं बिघडवेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology 2026: नवीन वर्ष 2026 सुरू व्हायला आता काहीच दिवसांचा काळ उरला आहे. नवीन सालाकडून प्रत्येकाला काही गोष्टींची अपेक्षा असते, नवीन वर्षात लाभ होईल की नुकसान याची मनात शंका असतेच. प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षाचं स्वागत आनंदात करतो. पण 2026 मध्ये काही अशुभ योगांची निर्मितीसुद्धा होणार आहे, त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसेल.
advertisement
कुंभ रास - या राशीत राहु दीर्घकाळ राहणार आहेत आणि काही महिन्यांसाठी मंगळसुद्धा त्याच्यासोबत येईल. यामुळे राग, घाई आणि चुकीच्या निर्णयांची शक्यता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वाद, वरिष्ठांशी मतभेद आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका. पैशांच्या बाबतीत नुकसान किंवा विनाकारण खर्च होऊ शकतो. नात्यांमध्ये बोलताना काळजी घ्या, नाहीतर छोटी गोष्ट मोठी होऊ शकते.
advertisement
सिंह रास - 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला आहे. रागाच्या भरात घेतलेला एखादा निर्णय नंतर पश्चात्तापाचं कारण बनू शकतो, त्यामुळे संयम राखणं खूप गरजेचं असेल. काम आणि खासगी जीवन या दोन्ही ठिकाणी दडपण जाणवू शकतं. मानसिक ताण वाढू शकतो, मन अस्वस्थ राहू शकतं. कामात आत्मविश्वास वाटणार नाही. या वर्षी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहणं तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरेल.
advertisement
2026 मध्ये गुरु, शनि, मंगळ, राहु आणि केतूची स्थिती - ज्योतिषीय दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष खूप हालचालींचं असणार आहे. गुरु या वर्षी दोनदा राशी परिवर्तन करेल. गुरू आधी कर्क राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर सिंह राशीत. विशेष म्हणजे बृहस्पती 2025 पासून अतिचारी गतीने चालत आहेत आणि ही स्थिती पुढील सुमारे 8 वर्षांपर्यंत राहणार आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींच्या जीवनावर खोलवर पाहायला मिळेल.
advertisement
राहु आणि केतूचा प्रभाव सुद्धा 2026 मध्ये खूप धोकादायक असणार आहे. हे दोन्ही छाया ग्रह 5 डिसेंबर 2026 ला राशी बदलतील, पण त्यापूर्वी ते इतर ग्रहांसोबत मिळून अनेक अशुभ आणि उलथापालथीचे योग तयार करतील. राहु सध्या शनीच्या कुंभ राशीत आहेत आणि डिसेंबर 2026 पर्यंत तिथेच राहील. याच दरम्यान जेव्हा 23 फेब्रुवारी 2026 ला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा राहु-मंगळ युती होईल, ज्याला अंगारक योग म्हटलं जातं.
advertisement
यानंतर मंगळ जेव्हा कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत पोहोचेल, तेव्हा तिथे आधीपासून असलेल्या शनीसोबत त्याची युती होईल. ऊर्जा आणि अग्नि तत्त्वाचं प्रतीक असलेला मंगळ जेव्हा शनीसारख्या कठोर आणि शिस्तप्रिय ग्रहाला भेटतो, तेव्हा अनेक क्षेत्रांत तणाव वाढू शकतो. हा संयोग काही राशींसाठी संघर्ष, अडचणी आणि मानसिक दबावाचं कारण ठरू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








