Crime : जीव किती स्वस्त झाला; फक्त 100 रुपयांच्या किराणा वादासाठी भयंकर हत्या,शहापूरमधील घटना
Last Updated:
Shahapur Crime News : शहापूरच्या खरमेपाडा परिसरात किराणा वादातून एक हत्या झाली असून पोलिसांना या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेली आहे.
ठाणे : शहापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे एका क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे. नेमकं यामागे कारण काय होत आणि पोलिसांना आरोपीचा शोध कसा लागला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हत्येचे नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार,अवघ्या 100 ते 150 रुपयांच्या किराणा साहित उधार न दिल्याने झालेल्या रागातून एका व्यक्तीचा जीव गेला आहे. शहापूर तालुक्यातील कळमगावातील खरमेपाडा येथे 7 डिसेंबर रोजी ओढ्यात एक मृतदेह आढळला जो वाशाळा येथील बाळू वीर (वय 42) याचा होता.
पोलिसांनी तपास सुरू केला असता उघडकीस आले की ही हत्या किराणा दुकानाच्या वादातून झाली होती. विठ्ठल पारधी (वय 36) नावाच्या आरोपीने आपल्या दुकानातून किराणा उधार दिला नाही म्हणून बाळू वीरने त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर शिवीगाळ केली होती.
advertisement
रागाच्या भरात पारधीने वीरच्या डोक्यात भक्कम फटका मारला. गंभीर जखमी झालेल्या वीरला त्यानंतर खांद्यावरून उचलून पाण्याच्या ओढ्यात टाकले. हत्येच्या ठिकाणी त्याच्या शरीरावर दगडही ठेवला. पारधीने पोलिसांना ही घटना कबुल करून दिल्याचे समोर आले आहे. शहापूर पोलिसांनी ग्रामीण गुन्हे शाखेच्या मदतीने तत्काळ आरोपीला ताब्यात घेतला असून गुन्ह्याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime : जीव किती स्वस्त झाला; फक्त 100 रुपयांच्या किराणा वादासाठी भयंकर हत्या,शहापूरमधील घटना









