निवडणुकीसाठी काय पण! कर्मचाऱ्याचा थेट महानगरपालिकेतील सराकारी नोकरीचा राजीनामा
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Municipal Election: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात इच्छुकांची अक्षरशः गर्दी होत आहे. नगरसेवकपदासाठी राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच आता महापालिकेतील कर्मचारीही पुढे सरसावत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील एका कायमस्वरूपी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने थेट निवडणूक लढविण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याची घटना घडली आहे.
महापालिकेच्या क्रीडा विभागात कार्यरत असलेले गणेश पवार यांनी बुधवारी आपला राजीनामा प्रशासनाकडे सादर केला असून तो तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी रोजच नगरसेवकांचा वावर, त्यांचा लोकांशी संपर्क आणि स्थानिक पातळीवरील राजकीय प्रभाव पाहत असतात. या प्रक्रियेतून अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात ‘आपणही लोकप्रतिनिधी व्हावे’ अशी इच्छा निर्माण होत आहे.
advertisement
यापूर्वी 2015 च्या महापालिका निवडणुकांमध्येही काही कर्मचाऱ्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढविली होती. मात्र, त्यापैकी बहुतांश जणांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. तरीही लोकशाही प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची इच्छा आणि राजकारणात संधी मिळवण्याचा आत्मविश्वास यामुळे यंदा पुन्हा कर्मचारी वर्गातून इच्छुक पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
निवडणुकीसाठी काय पण! कर्मचाऱ्याचा थेट महानगरपालिकेतील सराकारी नोकरीचा राजीनामा









