मराठवाड्यासाठी रेल्वेचा मास्टर प्लॅन, 3 नवे मार्ग होणार, संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वे थेट पुण्याला जाणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Railway Update: मराठवाड्याला रेल्वेनं खास गिफ्ट दिलं असून 3 नवे मार्ग होणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरहून थेट पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना देणाऱ्या तीन महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे हा महत्त्वाचा मार्ग होणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर-बिडकीन-पैठण-गेवराई-बीड-सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर-वेरूळ-कन्नड-चाळीसगाव या मार्गांचा यात समावेश आहे. हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन डॉ. कराड यांनी विविध रेल्वे विषयक मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना गती देण्याची गरज असल्याचे डॉ. कराड यांनी अधोरेखित केले.
advertisement
नवी वंदे भारत सुरू करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच छत्रपती संभाजीनगरला स्वतंत्र रेल्वे विभागाचा दर्जा देऊन तो मध्य रेल्वेअंतर्गत समाविष्ट करावा, अशी भूमिका मांडण्यात आली. यावर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतंत्र रेल्वे विभागाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
advertisement
विकासाला चालना
view commentsदरम्यान, छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या सुमारे 85 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सहा महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा मार्ग पुढे पुण्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही डॉ. कराड यांनी दिली. या सर्व प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण सुलभ होऊन औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 18, 2025 2:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यासाठी रेल्वेचा मास्टर प्लॅन, 3 नवे मार्ग होणार, संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वे थेट पुण्याला जाणार











